Advertisements
चंद्रपूर – शहरातील बाबूपेठ भागातील बहुतांश नागरिक सकाळी फिरण्याकरिता जुनोना रोड वर जातं असतात, जिल्ह्यात प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांना ताजी व शुद्ध हवा सकाळच्या सुमारास मिळते त्यासाठी नागरिक आपल्या सोयीनुसार सकाळी मॉर्निंग वॉक करायला जातात.
परंतु ही मॉर्निंग वॉक कधीकधी जीवावर बेतते, अशीच एक घटना 11 जूनच्या सकाळी जुनोना रोड वर घडली.
सकाळच्या सुमारास असंख्य नागरिक जुनोना रोडवर फिरत असताना अनियंत्रित हायवा ट्रक ने दोघांना धडक दिली यामध्ये 60 वर्षीय शेंडे नामक वृद्ध हा ठार झाला व अन्य 1 जण गंभीर जखमी झाले.
मृतक शेंडे हे बाबूपेठ येथील निवासी होते नेहमीप्रमाणे ते मॉर्निंग वॉकला गेले पण परिवारातील सदस्यांना काय माहीत ते घरी अश्या अवस्थेत परतणार.
सकाळच्या सुमारास या मार्गावर जडवाहनांची वाहतूक सुरू असते.