रानडुकराच्या हिंसक हल्ल्यात नांदा येथील शेतकरी जखमी, वनविभागाकडून घटना स्थळी पंचनामा

0
35
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा

नांदा येथील शेतकरी के. व्यंकटेश्वरलू वय ५५ वर्ष दिनांक ८ मे रोजी सकाळी ६ वाजताचे सुमारास शेतात जात असतांना रानडुकराने अचानक केलेल्या हिंसक हल्ल्यात जबर जखमी झाल्याने शेतात पडून होते राजेश भुते व सुर्यभान कामटकर या दोघांनाही के. वेंकटेश्वर यांना कोणीतरी जखमी अवस्थेत पडलेले दिसल्याने त्यांनी तात्काळ जखमी अवस्थेत असलेले के व्यंकटेश्वरलू यांना उचलुन आणून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले दैवबलवत्तर होते म्हणून शेतकर्‍याचा जीव वाचला नांदा गावालगत असलेल्या शिंदे यांच्या शेतात रानडुकरांनी हल्ला केल्याने गावातील नागरिकांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे असून सतर्क राहण्याचे आव्हान वनविभागाकडुन करण्यात आले असून तातडीने मदत मिळण्याकरिता पंचनामा करून आर्थिक मदतीकरिता अहवाल वरिष्ठांकडे पाठविणार असल्याची प्रतिक्रिया वनरक्षक रोठोड यांनी News 34 शी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here