केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध, 5 संघटनांनी एकत्र येत केली निदर्शने

0
126
Advertisements

प्रतिनिधी/विक्की गुप्ता

घुग्गुस –  : भारत सरकार नि नुकतेच पन्नास करोड रु चे वाटप कोल इंडिया ला देऊन कर्मीशीयल मायनींग पन्नास खदान खाजगी मालकाला विकण्याचं निर्णय घेऊन कोल इंडिया चे एक प्रकारे खाजगीकरण करण्याचा सपाटा लावला तसेच श्रम कायद्यात बद्दल कोळसा उद्योगाचे खाजगीकरण ठेकेदारी मजदूर यांना एचपीजी नुसार किमान वेतन 940 / 960 नवा वेतन आयोग लागू करण्यासाठी इंटक, आयटक, भा.म.स, एचएमएस, सीआयटीयू या पाचही केंद्रीय श्रम संघटना यांनी एकमुखानी निर्णय घेऊन भारत सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा कडाडून विरोधी करण्यासाठी एकत्र आले त्या नुसार वेकोली वणी एरिया मध्ये पांच श्रमिक संघटना एकत्र येऊन सकाळी दहा वाजता पासून मुख्य महाप्रबधक यांच्या कार्यालया.
समोर धरणे आंदोलन व 11 तारखेला गेट मिटींग नारेबाजी व मुख्यमहा प्रबंधक यांना निवेदन देण्यात येत आहे गेल्या तीन दिवसा पासून वणी एरिया मध्ये पैनगंगा परियोजना, मुंगोलि परियोजना, निलजई, नायगाव, कोलगाव, सीजीएम ऑफिस ताडाली उर्जाग्राम, केंद्रीय कार्य शाला ताडाली या ठिकाणी नारेबाजी गेट मिटींग घेऊन कामगाराना प्रोत्साहन देण्यात आला. या वेळी इंटक यूनियनचे लक्ष्मण सादलावर यांच्या नेतृत्वाखाली रामपाल वर्मा, जी. विजय कुमार, जुबेर अहमद, सुनील जानवे, श्रीकांत माहुलकर आयटक यूनियनचे नेतृत्व मुरली चिंतलवार, जियाउल्हाखान, देवानंद सुटे, विजय अद्दूरवार डीबी पाटील, महादेव बावणे भा.म.स यूनियनचे राजू नामपेल्लीवार, हरिदास दुधबळे, विजय माळवी, एपि.गुप्ता, एचएमएस यूनियनचे दीपक जयस्वाल, विकास सोनटक्के, संजय आटकूरवार, भारत जीवन, सीआयटीयू यूनियनचे प्रमोद अर्जुनकर, राजू सूर्यवंशी हे उपस्तित राहून कामगारांना कोल इंडिया च्या खासगी करणा विरुद्ध केंद्रसरकार कसा कुटाराघाट करीत आहे हे पटवून देत सर्व कामगारांना एकीचे दर्शन घडवून भारत सरकार चा निर्णय हा कामगार विरोधी असून हा केंद्र सरकारचा डाव उधळून टाकू कारण दहा व अकरा तारखेला केंद्र सरकार मोठा निर्णय कोल इंडिया बद्दल घेत आहे म्हणून पाचही श्रमिक संघटना नि जोरदार विरोध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here