त्या दलित कुटुंबाला न्याय कधी? जादूटोण्याच्या संशयावरून मारहाण प्रकरण, भाजपने केला निषेध, पीडितांना न्याय देण्याची मागणी

0
134
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदा येथील सरपंचाने जादुटोण्याच्या संशयावरून शेजारील एका दलित महिला व तिच्या मुलामुलीला मारहाण केल्याचे प्रकरण गेल्या 17 मे रोजी दुपारच्या सुमारास घडले होते.महिलेच्या तक्रारीनंतर तब्बल 3 दिवसांनंतर गडचांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.मीरा संतोष पाटील यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांना जबर मारहाण झाल्याची तक्रार देण्यासाठी महिला नांदाफाटा पोलिस चौकी येथे गेल्यानंतर तेथील एका पोलिस कर्मचार्‍यांने तीची समजूत काढून प्रकारण मिटवून टाका म्हणून तिला घरी पाठविले.मात्र आपल्या घराच्या लोकांना इतके मारल्यानंतरही गुन्हा दाखल होत नसल्याचे पाहून सदर प्रकरण महिलेने SDPO यांच्या लक्षात आणून दिले आणि SDPO यांच्या निर्देशानुसार अखेर 3 दिवसांनी गडचांदूर पोलिसांनी मारहाणीबाबत गुन्हा दाखल केला.मात्र आजतागायत आरोपींना अटक न केल्य पिडीत कुटुंब भयभीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.तणावपुर्ण परिस्थीती असून यात तिळमात्र ही फरक पडला नसल्याची खंत व्यक्त होत आहे.दरम्यान या घटनेचा निषेध करत घडलेल्या प्रकरणाची सखोल चौकशी करून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती,संजय गांधी निराधार योजना तालुकाध्यक्ष कोरपना तथा भाजप कार्यकर्ते संजय मुसळे यांनी News34 च्या माध्यमातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here