जिल्ह्यातील रेती तस्करांची हिम्मत या कारणाने वाढली, भाग 2

0
97
Advertisements

चंद्रपूर – जिल्ह्यात दारू, सुगंधित तंबाखू नंतर रेती तस्करीचा धुमाकूळ सुरू आहे, रेती तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की ते चक्क अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी नेतात, परंतु इतकी हिम्मत का बरं वाढत आहे तस्करांची हा महत्वाचा प्रश्न आहे.

आधी तस्करी सामान्य लोक करीत होते, हळूहळू हा व्यवसाय जोर पकडू लागला, कमी वेळात जास्त पैसा या तस्करीत मिळायला लागले, 1 हजार ब्रास रेतीच कंत्राट मिळाल्यावर त्या घाटावरून 10 हजार ब्रास रेती उचल व्हायला लागली, रॉयल्टी एका घाटाची व रेती चोरीचा हा प्रकार आता जोर धरू लागला आहे.

तस्कर आधी साधारण ट्रॅक्टरवर ही तस्करी करीत होते आता तर 20 लाखांचे हायवा घेत तस्करी सुरू झाली.

आज तस्कर स्वतः कोट्यवधींचे वाहन घेत जिल्ह्यात फिरतात, कारण या तस्करी मध्ये अनेक अधिकाऱ्यांचा सहकार्य त्यांना तस्करांना लाभत आहे.

या तस्करांची हिम्मत वाढली कारण आता या अवैध कामात राजकीय पुढाऱ्यांनी उडी घेतली आहे, विविध राष्ट्रीय व क्षेत्रीय पक्षाचे पदाधिकारी हे काम करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here