कोरपना येथे नाभिक समाजाचे तहसीलदारांना निवेदन, दुकाने सुरू करण्याची मागणी

0
111
Advertisements

कोरपना – गेल्या तीन महिन्यापासून नाभिक समाजाची दुकाने बंद आहे.त्यामुळे त्यांच्यावर रोजगाराअभावी उपासमारीची पाळी आली आहे. यावर त्वरित तोडगा काढून दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी.अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका कोरपना यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली.
नाभिक समाजाची दुकाने बंद असल्याने त्यांच्या कुटुंबिय पुढे उपासमारी संकट कोसळले आहे. त्यामुळे त्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी,संरक्षण किट पुरवावी,
आदी सह अनेक मागण्या करण्यात आला. तत्पूर्वी सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळत कोरपना तील मुख्य मार्गाने मुक मोर्चा काढण्यात आला. तसेच ठाणेदार यांनाही निवेदन देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने नाभिक बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here