कापूस खरेदी न करणाऱ्या जिनिंगची मान्यता रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

0
109
Advertisements

चंद्रपूर : सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड धानोरा ता. जिल्हा चंद्रपूर यांची कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर यांचेकडील बाजार समितीची अनुज्ञाप्ती रद्द करण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्र चंद्रपूर यांच्याकडे करण्यात आलेली औद्योगिक व्यवसाय नोंदणी देखील रद्द करण्यात येत आहे.तसेत,भारतीय कापूस पणन महामंडळ मर्यादित (सीसीआय) यांच्याशी कापूस खरेदी संदर्भाने केलेला करारनामा रद्द करण्यात येत आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर या कार्यालयाकडील दिनांक 8 मे 2020 रोजीच्या आदेशान्वये दररोज 70 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्याबाबत आदेशित केले होते. परंतु, जिनिंग व प्रेसिंग तर्फे त्या पद्धतीने कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. तसेच  जिनिंग व प्रेसिंग शासकीय कापूस खरेदी प्रक्रियेत पूर्णपणे सहकार्य करीत नाही. जिनिंग व प्रेसिंग युनिट पूर्ण क्षमतेने चालविले जात नाही.यावरून यापुढे आपणास हमीभाव दराने कापूस खरेदी करण्यात काही स्वारस्य नसल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.

सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडला नोटीस देऊन 2 दिवसाच्या आत लेखी म्हणणे मांडण्यासाठी वेळ देण्यात आला होता. परंतु, अद्यापही जिनिंग कडून कोणतेही लेखी अथवा तोंडी म्हणने प्राप्त झाले नाही.

वरील परिस्थिती पाहता यापुढे कापूस खरेदी करण्यास इच्छुक नाही अथवा स्वारस्य नाही त्यामुळे सोसायटी अॅग्रो प्रोसेअर्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे मान्यता रद्द करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here