शहरातील त्या वृंदावनात भाजप नगरसेवकाने सोशल डिस्टनसिंग नियमांची केली पायमल्ली

0
116
Advertisements

चंद्रपूर – कोरोना विषाणूचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असताना काही जनप्रतिनिधी शासनाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहे.

जिल्ह्यात सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा सह 144 कलम लागू आहे परंतु हम करे सो कायदा अशी परिस्थिती शहरात बघायला मिळत आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक 1 तुकुम मध्ये भाजप नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या स्वेच्छा निधीतून वृंदावन व तुळशी नगरमध्ये प्रवेश द्वाराचे उदघाटन करण्यात आले या कार्यक्रमात जवळपास 200 ते 300 नागरिक एका ठिकाणी जमा झाल्याने सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला, 7 जूनला जिल्ह्यात 11 कोरोना बाधित रुग्ण मिळाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली असताना भाजप नगरसेवक कार्यक्रम घेत होते.

या आयोजनाची त्यांनी परवानगी घेतली होती का? परवानगी तर प्रशासनाकडून सध्याची परिस्थिती बघता मिळणारच नव्हती, तर या प्रकारावर जिल्हा प्रशासन काही कारवाई करणार का यावर आता जनतेचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here