चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करांचं पॉवरफुल्ल नेटवर्क, रेती तस्करांवर प्रशासनाची कारवाई नाममात्र, भाग 1

0
111
Advertisements

चंद्रपूर – खनिज संपत्तीने फुललेला जिल्हा म्हणजेच चंद्रपूर, या जिल्ह्यात कोळसा, गौण व रेती यांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, मोठे उद्योग जिल्ह्यातील खनिज संपत्तीवर अवलंबून आहे.
मात्र आता हेचं खनिज तस्करांसाठी सोनं बनल आहे, मागील वर्षभरापासून जिल्ह्यातून लाखो ब्रास रेतीची चोरी झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
या रेती तस्करीवर नियंत्रण कुणाचंच नाही सर्व अर्थकारण समोर आणून आपापली सोय करताना दिसत आहे.
खनिकर्म विभाग पण कुंभकर्णी झोपेत गेला असल्याने तस्करांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, विशेष म्हणजे या सर्व रेती तस्करांचे जिल्ह्यातील नेटवर्क पॉवरफुल्ल आहे प्रशासन अजूनही जुन्या पद्धतीने काम करीत आहे.
वर्ष 19-20 या कालावधीत खनिकर्म व तहसिल प्रशासनातर्फे 462 कारवाया करण्यात आल्या असल्या तरी या 462 मधून खनिकर्म विभागाच्या फक्त 15 कारवाया आहे, आणि एकूण झालेल्या कारवाईत फक्त 4 ते 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
रेती तस्करी करताना प्रशासनाने पकडले तर त्यावर कायदेशीर कारवाई करणे नियमात असताना सुद्धा कारवाई केली जात नाही, तस्कराला नेहमी प्रशासन वाचवीत आहे.

देशात कोरोनाचा कहर असताना लॉकडाउन करण्यात आले या वेळी जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असताना सुद्धा जिल्ह्यात व जिल्हाबाहेरील रेती तस्करी जोरात सुरूच आहे.
रेती घाटाचे लिलाव अद्याप झालेले नाही, जिल्ह्यातील काही घाट पर्यावरण विभागाच्या ना हरकत साठी रखडून गेले जात आहे नंतर या रखडलेल्या घाटातूनच लाखो ब्रास रेती तस्करी होत आहे.
घाटाचे लिलाव करताना प्रशासन रेती साठ्याची मोजणी करतात परंतु घाट लिलाव हे पावसाळ्यात होत असताना कुणीही घाट घेण्याकरिता आपली रुची दाखवीत नाही कारण रेती व्यवसायिक आधीच लाखो ब्रास रेती उचलून टाकतात.
स्वतःच्या घाटावरील रॉयल्टी आणि दुसऱ्या घाटाची रेती हे प्रकार आता नेहमीचेच झाले आहे, परंतु प्रशासन यावर कारवाई का करीत नाही हा सर्वात मोठा गंभीर प्रश्न आहे.
कोट्यवधींची रेती ही चोरीला जात आहे आणि प्रशासन मृग गिळून गप्प बसलेला आहे.
आज एक हायवा रेतीची किंमत 35 ते 40 हजार व एक ट्रॅक्टर 4 हजार रुपये, या तस्करीने शासनाला कोट्यवधी महसुलाचा फटका बसत आहे.
कायदेशीर कारवाई न करता निव्वळ दंडात्मक कारवाई करून तस्करांना रेती तस्करी साठी पुन्हा मोकाट सोडले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here