राज्यातील शासकीय आय. टी. आय मधिल ३ हजार तासिका तत्वावरील निर्देशकांचे वेतन देण्यात यावे, आमदार किशोर जोरगेवार यांची कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांना मागणी

0
154
Advertisements

चंद्रपूर – कोरोनामूळे लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमूळे शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहे. त्यामूळे शासकीय आय.टि. आय कॉलेज सूध्दा बंद आहे. मात्र आय. टि. आय येथे तासिका तत्वावरील निर्देशक म्हणून काम करणारे शिक्षण शासनाच्या आदेशानूसार विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देत आहे. असे असले तरी कोरोनाच्या पाश्वुभूमीवर या कर्मचा-यांचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची कोरोना काळातील सेवा लक्षात घेवून सहनभूतीपूर्वक विचार करुन त्यांच्या वेतनात कपात न करता त्यांचे तिन महिण्यांचे वेतन अदा करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी कौशल्य विकास मंत्री नवाब मलीक यांना निवेदनातून केली आहे.
राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंध म्हणुन महाराष्ट्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा, महाविद्यालय, संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. राज्यातील ४१७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुमारे तीन हजार तासिका निर्देशक व्यवसाय प्रशिक्षण देण्याचे काम करीत असून कौशल्य विकास कार्यक्रमामध्ये तासिका निर्देशक देखील महत्वाची भुमिका बजावत आहेत परंतु कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विद्यार्थ्याना सुट्या घोषित झाल्यानंतर तासिका निदेशकांनी आय.टी.आयमध्ये येवु नये असे प्राचार्यामार्फत सांगण्यात आले. मात्र राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आय.टी.आय विद्यार्थ्याना घरबसल्या प्राध्यापकांनी रोज दोन तास ऑनलाइन व्याख्याने आणि परिक्षा घ्याव्यात अशा सुचनाही व्यवसाय प्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. या सुचनांचे पालन करीत महाराष्ट्रातील ४१७ आय.टी.आय मधील सुमारे ३००० तासिका निर्देशक ऑनलाइन प्रशिक्षणाचे काम करत आहेत. असे असतांनाही या कर्मचा-यांच्या वेतनात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश आय.टी.आय मधील तासीका निर्देशकांचे मानधन अद्यापही मिळालेले नाही. संचारबंदीपूर्वी काळातील वेतनही या कर्मचा-यांना देण्यात आलेले नाही. लॉकडाउनमुळे घरीच असल्याने शिक्षकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामूळे याकडे गांभिर्याने पाहत राज्यभरातील या कर्मचा-यांच्या वेतनात कोणतीही कपात न करता या कर्मचार्याचे स्थगीत वेतन अदा करण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी कौशल्य विकास मंत्री यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here