चंद्रपूर – अरे हे काय कोरोना नियंत्रण कक्षातच जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडवीत साजरा केला.
या संपूर्ण प्रकारचे फोटो समाज माध्यमात चांगलेच व्हायरल झाले असून डॉ गहलोत यांनी या वृत्तावर आमच्या सहकाऱ्यांनी अचानक केक आणला आम्ही सर्वांनी, सर्वांना सॅनिटायज करीत कार्यक्रम केला असा दुजोरा दिला.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत आहे, प्रशासन सर्वांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना देत असताना जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी यांचेकडून नियमांचे उल्लंघन झाले, या सर्व प्रकारची जिल्हाधिकारी दखल घेणार का? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेत उदभवला आहे.
जिल्ह्याला नियमांचे पालन करणाऱ्या कोविड योद्धांचे हे कोरोना महामारीत धाडसचं म्हणावेच लागणार, जिल्हाधिकारी आज सर्व परिस्थिती उत्तम प्रकारे हाताळत असताना जबाबदार अधिकाऱ्यांचं वागणं कितपत योग्य आहे?