गडचांदूरातील कोरोना योद्धांची कामगिरी संशयाच्या भोवर्‍यात, दिल्लीवरून आलेल्या त्या तरूणाला होम क्वारंटाईन,इतरांना मात्र संस्थात्मक विलगीकरण, कुठे आर्थिक व्यवहार तर कुठे हितसंबंध जोपासण्याचा न.प.वर आरोप

1
159
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठे, औद्योगिक शहराच्या नावाने प्रसिद्धी प्राप्त गडचांदूर शहर येथे 7 जून रोजी कोरोनाचा एक रुग्ण आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ माजली.यामुळे शहरात कमालीची दहशत पसरल्याचे चित्र पहायला मिळत असून सदर रुग्ण रशिया येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता आणि गेल्या 4 जून रोजी दिल्ली येथून गडचांदूर आपल्या स्वगावी आला होता. येथे पोहोचल्यावर न.प. व आरोग्य विभागागाने त्याला होम क्वारंटाईन करून त्याचे स्वॅब नमुने पाठवले. मात्र 7 जून रोजी त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयाला प्राप्त झाली. त्यामुळे तो वास्तव्यास असलेला संपूर्ण परिसर पोलिस व आरोग्य विभागाने त्वरित सील केला. सदर तरूणाचे वडील डॉक्टर असून त्यांच्याकडे बरेच रुग्ण येतात. तसेच त्यांच्याकडे अनेक आंतररुग्ण सुद्धा असल्याची माहिती असून रुग्णाला रात्रीच्या सुमारास चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. वास्तविक पाहता सदर रुग्णाला जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे संस्थात्मक विलगीकरण करणे अत्यंत आवश्यक होते मात्र येथील कोरोना योद्धांनी त्याला होम क्वारंटाईन केले.

इतरांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जात आहे मग याच्यावर इतकी मेहरबानी कशासाठी ? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे. कोरोनाची संधी साधून शासनाचे नियम धाब्यावर बसवून बिनधास्त पार्ट्या व कधी ना केलेले वाढदिवस मोठ्या जल्लोषात न.प.मध्येच साजरा करणारे नगरपरिषद प्रशासनाच्या कोरोना योद्धांची भूमिका याप्रकरणामुळे संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. सदर रुग्णाला होम क्वारंटाईन करण्याच्या बदल्यात आर्थिक व्यवहार झाल्याची खमंग चर्चा शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. कुठे आर्थिक तर कुठे मैत्रीपूर्ण संबंध जोपासले जात असल्याचे आरोप नागरिकांकडून होत असून यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजून कुणाकुणावर अशी मेहरबानी करण्यात आली देव जाणे. मात्र होम क्वारंटाईन असलेला सदर तरूण पाळीव कुत्रा घेऊन रस्त्यावर फिरायचा,परिसरातील मेडिकल स्टोअर व इतर दुकानात बसायचा तेव्हा न.प.चे कोरोना युद्धा काय करत होते ? खरच तो एका रूममध्ये क्वारंटाईन होता का ? परिवारातील इतरांच्या संपर्कात आला का ? सदर दवाखान्यात किती रूग्ण व इतर येत होते असे एकनाअनेक प्रश्न आता नागरिक उपस्थीत करत असून इतरांप्रमाणेच यालाही संस्थात्मक विलगीकरण केले असते तर कदाचित संसर्गाचा धोका निर्माण झाला नसता असे मत व्यक्त होत आहे.

एकुणच नाना कारणाने सतत विवादास्पद ठरलेल्या गडचांदूर नगरपरिषदेच्या co डॉ.विशाखा शेळकी यांची संपूर्ण टीम याला जबाबदार असून कोरोनाच्या युद्धात सपशेल अपयशी ठरल्याचे मत व्यक्त होत आहे. यांच्या पुढे लोटांगण घालणाऱ्या मोजक्या लोकांना आपल्या बाजूने करून कर्तव्यदक्षेतेचा व्यवस्थीतरीत्या गवगवा करून घेण्यात मग्न असलेल्या न.प.प्रशासनाचे यानिमित्ताने पितळ उघडे पडले हे मात्र नक्की. यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करून कित्येक तक्रारी वरिष्ठांना देण्यात आल्या मात्र कोणतीच कारवाई होत नसल्याने “हम करे सो कायदा” अशी परिस्थीती सध्या निर्माण झाली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here