वाघाच्या क्षेत्रात 2 लाख 40 हजारांचा मोहसडवा जप्त, 2 आरोपी अटकेत

0
26
Advertisements

चिमूर – आज रोजी कोलारा गावातील जंगल भागातील शेतशिवारात वाघाचे होणाऱ्या हमला सत्राला रोखथांब करणेकरिता चिमूर येथील पोलीस स्टॉप हे कोलारा भागातील शेतकरी बांधवाना माहिती देत असताना गोपनीय माहितीच्या आधारे कोलारा भागातीलच काही अवैद्य दारू विक्रेते यांनी मोहसडवा स्वतःच्या शेतात लपून ठेवला आहे अशी माहिती मिळाल्याने प्रॉव्हिशन रेड केली असता आरोपी येनुदास नामदेव पोहिंकर यांचे शेतात एकूण 1,60,000 रु चा मोहासडवा व आरोपी गोपीचंद तुलसीदास पोहिंकर याचे शेतात 80,000 रु चा मोहासडवा असा एकूण 2,40,000 रु चा मुद्देमाल मिळून आल्याने दोन्ही आरोपीवर दारूबंदी अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून सदरची कारवाही मा. श्री .अनुज तारे , उप विभागीय पोलीस अधिकारी मूल अति.कार्यभार चिमूर, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांचे मार्गदर्शनात पोहवा डोनू मोहूर्ले , नापोशी दिनेश सूर्यवंशी , पोशी विशाल वाढई यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here