संविधानाचा अपमान करणाऱ्याला अटक करा : प्रबोधन विचार मंच

0
106
Advertisements

चंद्रपूर – देशात कोरोनाची दहशत सुरू आहे, कोरोनाला आटोक्यात करण्यासाठी प्रशासन कठीण मेहनत घेत आहे.

अश्या परिस्थितीत देशात एकात्मता निर्माण होणे नितांत गरजेचे आहे.

अश्या स्थितीत भारतीय संविधानाचा अपमान होईल आणि समाजात तेढ निर्माण होईल अश्या आशयाची पोस्ट फेसबूक वर संदीप कुकडपवार यांनी केलेली आहे.

अश्या पोस्ट ने देशातील संविधान मान्य लोकांचे अपमानच झाले आहे… या पोस्ट मुळे समाजात तणाव निर्माण होऊ शकतो किंवा तसा संदीप कुकडपवार चा तसा हेतूही असू शकते ….

कोरोनाच्या महामारीत समाजात तेढ निर्माण करून सामाजिक वातावरण खराब करू पाहणाऱ्या संदीप कुकडपवार यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी …अशी मागणी करणारे निवेदन प्रबोधन विचार मंच ने पोलीस अधीक्षक चंद्रपुर जिल्हा यांना दिले….

सोबतच अमजद पापाभाई शेख ( हजरत टिपू सुलतान फाउंडेशन) , प्रविण खोब्रागडे (अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष) राहुल घोटकर (रक्षण धरणी मातेचे )..
समीर शेख (युथ ॲाफ चांदा ) सर्व धर्मिय छत्रपति शिवाजी महाराज जयंती उत्सव समेती..
विशाल गिरी ( रामराज्य संघटन) इ संघटनेने ही आरोपीला अटक करण्याची मागणी करणारे निवेदन दिले…

यावेळी विपुल रंगारी, रितीक खोब्रागडे, प्रणित उराडे, प्रफुल रंगारी, संकेत वेल्हेकर, राजस खोब्रागडे, बोरकर इ. उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here