मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद, गडचांदूरातील रक्तदान शिबिरात 131जणांचे रक्तदान, आमदार सुभाष धोटे मित्रमंडळाचे आयोजन

0
66
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गडचांदूर येथील बालाजी सेलिब्रेशन येथे आमदार सुभाष धोटे मित्र मंडळ,कोरपना तालुका मराठी पत्रकार संघ,मुस्लिम युवा मंच गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराला भरभरून प्रतिसाद देत एकूण 131रक्तदात्यांनी रक्तदान करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला.शिबिराचे उदघाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी रा.काँ.विधानसभा प्रमुख अरूण निमजे,राजूराचे नगराध्यक्ष अरूण धोटे,ठाणेदार गोपाल भारती,पं.स.चे माजी सभापती नोगराज मंगरूळकर,नगराध्यक्षा सविता टेकाम,राजुराचे उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे,गडचांदूरचे उप नगराध्यक्ष शरद जोगी,न.प.गटनेते विक्रम येरणे,गटनेत्या कल्पना निमजे,शिवसेनेचे माजी उप नगराध्यक्ष सचिन भोयर,आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे,हंसराज चौधरी,नगरसेवक पापय्या पोन्नमवार,राहूल उमरे,अरविंद मेश्राम,अर्चना वांढरे आदींची उपस्थीती होती.जिल्ह्यातील गडचांदूर या एकच ठिकाणी पारपडलेले सर्वात मोठे रक्तदान शिबीर ठरल्याचे उपस्थीत डॉक्टरांच्या चमूने सांगितले.शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले होते.सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघ अध्यक्ष आशिष देरकर व इतर सहकाऱ्यांसह विक्रम येरणे,बालाजी पुरी,सतिश बेतावर,अशोक बावणे,राहूल उमरे,अभय मुनोत,उमेश राजूरकर,शैलेश लोखंडे,गणेश तुराणकर,प्रितम सातपुते,प्रवीण झाडे,रुपेश चूधरी, मयूर एकरे,आकाश वराठे,चेतन शेंडे,निखील एकरे,आशिष वांढरे,अतूल गोरे व इतरांनी मोलाचे सहकार्य सहकार्य केले.
—————-//————–
“ठाणेदार भारतीसह 15 पोलिसांचे रक्तदान”
गडचांदूरचे पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती,सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद शिंदे,पोलिस उपनिरीक्षक युवराज पाटील,पोलिस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांच्यासह एकूण 15 पोलिस कर्मचाऱ्यांनी या शिबिरात रक्तदान करून कोरोनाच्या संकट समयी आपले योगदान दिले.
—————–//—————
नववर-वधुंनीही केले रक्तदान
कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील नववर स्वप्नील एकनाथ सोनवणे व नववधू रेश्‍मा रमेश लाड या नव दाम्पत्यांनी विवाहानंतर लगेच रक्तदान करून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here