Advertisements
गडचांदूर – जिल्ह्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या 24 असताना 22 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला होता परंतु आता बाहेर जिल्हा व राज्यातून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहे.
आज गडचांदूर शहरात एक कोरोनाबधित रुग्ण आढळला सदर रुग्ण हा रशिया मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होता, 4 जून ला युवक दिल्ली वरून गडचांदूर शहरात आला होता, प्रशासनाने त्याला होम कोरेन्टाईन केले होते लक्षणे आढळल्यावर त्याची तपासणी करण्यात आली.
आज त्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तात्काळ प्रशासनाने त्या युवकाचा वास्तव्यास असलेला स्टेट बँक परिसर सील करून निर्जंतुकीकरण करण्याची सुरुवात झाली.
आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 29 झाली असून ऍक्टिव्ह रुग्ण 7 झाले आहे.