गडचांदूर/सैय्यथ मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतीच्या श्रेणीत असलेल्या नांदा,बिबी व आवारपूर येथील शेकडो लाभार्थी वार्षिक उत्पन्न कमी दाखवून सरकारी रेशन दुकानातून कमी दराने धान्याची उचल करत आहे.मात्र आता असे लाभार्थी धान्यापासून वंचित होणार असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.या तीनही गावांमध्ये अनेक सदन शेतकरी,सिमेंट कंपन्यांचे कामगार ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1लाखांच्यावर आहे.असे सुद्धा शासनाच्या स्वस्त धान्याचा लाभ घेत आहे.तलाठ्याकडून कमी रकमेचा उत्पन्न दाखला तयार करून या लोकांनी लाभ मिळविले आहे.जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांची नावे लाभार्थी यादीतून कमी करण्याची मागणी मनसेचे प्रकाश बोरकर यांनी कोरपना तहसीलदार महेंद्र वासलेकर यांच्याकडे केली होती.याची दखल घेत तहसीलदारांनी नुकतेच नांदा,बिबी व आवारपूर या ग्रामपंचायतींना पत्र पाठवून लाभार्थी योग्य आहे की,नाही यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.विधवा,निराधार अत्यल्प उत्पन्न असणार्या कुटुंबांसाठी अंत्योदय योजना असून या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 15 हजार रूपये इतके असून अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 59 हजार रू.वार्षिक उत्पन्न हवे आहे.मात्र इतके कमी उत्पन्न असणार्या कुटुंबांची संख्या बोटावर मोजावी इतकी असल्याने अनेक कुटुंबांना रेशन धान्यापासून वंचित होण्याची वेळ आली आहे.हे मात्र विशेष.
नांदा,बिबी,आवारपूरातील शेकडो लाभार्थी होणार रेशनपासून वंचित, उत्पन्न कमी दाखवून बनले लाभार्थी प्रकरण, तहसीलदारांचे ग्रामपंचायतींना पत्र
Advertisements