पैनगंगा नदीची वाळु वन क्षेत्रात जप्त, मात्र गडचांदूर क्षेत्रात अशी कारवाई का नाही ? हायवातील वाळुचे दर चक्क 35 हजार, मंडळ अधिकारी, तलाठ्याचे मौन.

0
189
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
“कोरोना” च्या पार्श्वभूमीवर शासनप्रशासन व्यस्त असल्याची संधी साधून कोरपना तालुक्यात वाळु तस्करांनी अक्षरशः थैमान घातले आहे.येथील विविध नदी नाले व घाटावरून मोठ्याप्रमाणात वाळूचा उपसा केला जात असून शासनाच्या तिजोरीला लाखोंचा चुना लावला जात आहे.रस्ता बंद करणे,गाड्या जप्त करणे,गुन्हे दाखल करणे असे अनेक प्रकार घडत असताना सुद्धा अजूनही तालुक्यातील कित्येक तस्करांचे मुस्के आवळण्यात स्थानीक महसुल विभाग अपयशी ठरल्याचे आरोप होत आहे.नानाप्रकारे युक्त्या वापरून वाळु चोरी करण्यात येत असल्याचे चित्र असून
अनेक युक्त्या वापरता रेती चोरी करून अवाच्या सव्वा दराने वाळु विक्री करीत आहे.पावसापुर्वी अनेक ठिकाणी अवैध वाळुची साठवणूक केली जात असल्याचा सुगावा कोरपना तहसीलदारांना लागताच पथक नेमून ठिकठिकाणी तपास सुरू केल्याने अकोला गावालगत वनराखीव क्षेत्रात 25 ते 30 ब्रास वाळू जप्त करण्यात आली.यापूर्वी तांबडी येथे जप्त केलेली वाळु तस्करांनी रातोरात गायब केली होती मात्र यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये हीच अपेक्षा.यासर्व घडामोडी लक्षात घेता गडचांदूर क्षेत्रात अशी कारवाई का होत नसावी असे प्रश्न नागरिकांना भेडसावत असून शासनाने पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लावली आहे.मात्र गडचांदूर येथील एक कंत्राटदार दररोज पहाटेच्या सुमारास गडचांदूर व परिसरातील खेड्यापाड्यात नदीची काळी वाळु बिनधास्त घरपोच आणुन देत आहे.याकडे कुणाचेही लक्ष नसणे आश्चर्यचकित करणारेच.

गडचांदूरात 25 ते 28 तर परिसरात चक्क 32 ते 35 हजार याप्रमाणे हा कंत्राटदार हायवा मालक गरजू लोकांकडून उकळत असून जंगल,शेतात,गावात साठवलेल्या वाळूचा शोध संबंधीत विभागाकडून घेतला जात आहे मात्र गडचांदूरच्या मुख्य मार्गावरून ये-जा करणाऱ्या तहसीलदार,पटवारी व मंडल अधिकारी यांना येथील पडलेले वाळुचे ठीग दिसत नसेल का ? हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.यात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी मौन धारण केल्याने यांची भूमिका संशयास्पद बनली आहे.वाळूचा कसून शोध घेत 3 ट्रॅक्टर जप्त केले मात्र गडचांदूरातील त्या कंत्राटदारांच्या हायवा वाहनावर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here