गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
विज विदर्भात तयार होते.शेती,कोळसा, पाणी विदर्भाचे वापरले,प्रदूषणही विदर्भाच्या वाट्याला आले.यावर कोरोनाचा मारही आम्हीच सहन करत आहो.त्यामुळे आमच्याकडे पैसाही उरला नाही म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समिती(VRAS)च्या निर्णयानुसार 7 जून 2020 रोजी लॉकडाउन नियमांचे पालन करत घरी राहून विदर्भाच्या जनतेला विज व विदर्भ आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.विदर्भाच्या सर्वच जनतेला विज बिलातून मुक्त करा.200 यूनिट पर्यंत विज बिल मोफत आणि त्यानंतरचे निम्मे करा.शेती पंपाच्या विज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करा.विदर्भाला विज प्रकल्पाच्या प्रदुषणातून मुक्त करा.अश्या मागण्यांचे फलक लावुन,घोषणा देऊन विदर्भातील सर्व जनतेने फोटो सोशल मीडियावर टाकण्याची विनंती माजी आमदार अँड.वामनराव चटप,राम नेवले, श्रीनिवास खांदेवाले,रंजना मामर्डे यांनी केले आहे.
सोशल मीडियावर 7 जून रोजी “विज व विदर्भ आंदोलन” कोरोनामुळे उद्योग,व्यापार,शेती, नोकरी,रोजगार बंद म्हणून विज बिल बंद, विदर्भ आंदोलन समितीचा निर्णय
Advertisements