Advertisements
चंद्रपूर – 2015 पासून चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या दारुबंदीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोनानंतर हा निर्णय घेऊ त्यासोबतच जनतेशी संवाद साधल्या जाणार असे वक्तव्य नियोजन भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिले.
दारूबंदी उठवावी यासाठी काही लॉबी जोर लावत आहे, यावर काही महिन्यांपूर्वी जनमत सुद्धा घेण्यात आले, पालकमंत्री वडेट्टीवार हे वेळोवेळी यावर लवकर निर्णय घेऊ असे वक्तव्य करतांना दिसत असले तरी गृहमंत्री देशमुख यांनी दारुबंदीवर पुढच्या काळात भाष्य करू असे सांगितले.