सागवान तस्करांच्या 24 तासांच्या आत चिमूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 4 आरोपी अटकेत

0
121
Advertisements

चिमूर -चोर असो की तस्कर 24 तासाच्या आत गुन्ह्याचा छडा लावण्यात चिमूर पोलीस अग्रेसर झाली आहे अश्यातच त्यांनी सागवान तस्करांच्या 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या.

03/06/2020 रोजी फिर्यादी नत्थु बालाजी तळवेकर. राहणार चिमूर यांचे तक्रारीवरून पो स्टे. चिमूर यांचे मौजा काग (बामणी) येथील शेत शिवारातून सागवान लाकुड. किं. ७५,००० रुपये चा माल अज्ञात चोरांनी चोरून नेल्याचे फिर्याद वरून अप क्र. 197/20 कलम 379,34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंद असून सदर गुन्ह्यातील माल व आरोपी यांचा शोध घेतला असता 04 आरोपी सर्व राहणार मौजा काग (बामणी), तह. चिमूर यांचा अथक परिश्रम घेऊन 24 तासाचे आत मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेतले.
सदरची कारवाही पो. नि. श्री.स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे अधिपत्याखाली सपोनि रवींद्र खैरकर, पोउपनी राजू गायकवाड, पोहवा डोनू मोहूर्ले, नापोशी दिनेश सूर्यवंशी , किशोर बोढे , पोशी विशाल वाढई, रवी आठवले , देविदास रणदिवे यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here