डांबर मधे अडकलेल्या नाग सापाला इको-प्रो कडून जीवदान

0
104
Advertisements

चंद्रपूर: शहरास नेहमी साप आणि वन्यजीव मोठया प्रमाणात निघत असतात, साप निघाल्याची माहिती मिलताच अनेक सर्पमित्र धाव घेऊन सदर साप पकड़ून सापचा जीव आणि नागरिकांची भीती दूर करण्याचे काम केले जाते. या घटनेत मात्र पकडण्यात आलेला नाग साप चक्क रोड बांधकामाच्या डांबर मधे अडकलेला दिसून आला.
शहरालगत असलेल्या बिनबा गेट ते चोराळा रस्त्यावरील शांतीधाम लगत असलेल्या ट्रांसपोर्ट मधे नाग जातीचा साप निघाला, तो बाहेर येताच रस्त्याचे बांधकाम दरम्यान पडलेल्या डांबर मधे अडकलेल्या स्थितीत होता. याची माहिती निखिल हेमके या युवकाने वन्यजीव-सर्प संरक्षण साठी कार्य करणाऱ्या इको-प्रो संस्थेस देण्यात आली. माहिती मिळताच संस्थेचे सदस्य सर्पमित्र राजेश व्यास सदर ठिकानीं जाऊन सापास रेस्क्यू केले. मात्र सदर सापास पूर्ण डांबर लागले असल्याने त्याची अवस्था गंभीर झाली होती याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष बंडु धोतरे यांना देण्यात आली.

यानंतर इको-प्रो कार्यालयात सदर सापास आणून त्याचेवरिल लागलेली पूर्ण डांबर काढण्यात आले. संस्थेचे सर्पमित्र बंडु धोतरे, अमोल उटटलवार, राजेश व्यास, अब्दुल जावेद, सचिन धोतरे, संजय सब्बनवार या सदस्यांनी सापाचे डांबर काढण्यासाठी प्रयत्न केले. विषारी नाग सापाला सुरक्षितरित्या पकडून, स्वतःची आणि सापाची काळजी घेत नाग सापास चिकटलेला डांबर काढण्यात आले. यानंतर सदर सापाची वनविभाग मधे नोंद करून चंद्रपूर मुल रोडवरील जंगलात निसर्ग मुक्त करण्यात आले.

महत्वाचे की, यापूर्वीसुद्धा याच रोडलगत एक कुत्र्याचे पिल्लू रस्त्याच्या बाजूला पडलेला डांबर मधे पूर्णपणे अडकले होते तेव्हा सुद्धा त्यास रेस्क्यु करून संस्थेच्या सदस्यांनी सदर कुत्र्याचे पिल्लू डांबर मध्ये काढून जीवदान दिले होते. यानिमित्ताने रस्ते बांधकामानंतर रस्त्याच्या कडेला असणारे डांबर चे भरलेले ड्रम त्वरित उचलून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here