भद्रावती येथील व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, जिल्ह्यात आज 2 रुग्णांची नोंद, एकूण ऍक्टिव्ह रुग्ण 4

0
67
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या कोरोना बाधित नागरिकामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह बाधिताची संख्या २६ झाली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचे हैदराबाद येथील नालाकुंडा जिल्ह्याचे रहिवासी असणारे हे गृहस्थ सध्या भद्रावती येथे कार्यरत आहेत. १ जून रोजी ते हैदराबाद वरून भद्रावती येथे जाण्यासाठी निघाले होते. त्यांची तपासणी चंद्रपूर येथील शकुंतला लॉन येथे करण्यात आली. ते एकटेच घरी राहत असल्यामुळे त्यांना गृह अलगीकरण (होम कॉरेन्टाइन ) करण्यात आले.
३ जून रोजी वरोरा येथे त्यांचा स्वॅब घेण्यात आला. आज सायंकाळी त्यांचा स्वॅब पॉझिटीव्ह आला. त्यांना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणतीही लक्षणे नाहीत.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत २६ झाले आहेत.आतापर्यत २२ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २६ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता ४ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here