300 युनिट वीज मोफत द्यावी – जिल्हा परिषद सदस्य बुटके यांची मागणी

0
152
Advertisements

चिमूर/शहर प्रतिनिधी सुरज कुळमेथे

चिमूर तालुक्यातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने जनता त्रस्त होत असल्याने याची दखल जिल्हा कांग्रेस जिल्हा सरचिटणीस तथा जीप सदस्य गजानन बुटके यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयातील सहाययक अभियंता गायकवाड मॅडम यांना निवेदन दिले .
चिमूर तालुक्यातील विद्युत व्यवस्था योग्य नसल्याने वारंवार विद्युत खंडित होत आहे दिवसागणिक बारा तासात चोवीस वेळी विदुयत खंडित होते नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आजच्या परिस्थितीत विद्युत पुरवठा अत्यंत आवश्यक झाल्याने तालुक्यातील नागरिक शेतकरी शेतमजूर विद्यार्थी शासकीय कार्यालये दवाखाने व व्यापारी यांचेवर प्रचंड परिणाम होत आहे जनता त्रस्त झालेली आहे.
त्यासोबत अन्य मागण्या असून चिमूर तालुक्यातील विद्युत ग्राहकांना 300 युनिट मोफत देण्यात यावे, विद्युत खंडित होत असल्यास विद्युत विभागाकडून विद्युत खंडित होण्याअगोदर सोशल मीडियावर संबंधित बाबीची माहिती प्रसारित करण्यात यावी ,विद्युत ग्राहकाचे कनेक्शन ग्राहकाचे विना परवानगी ने कापण्यात येऊ नये, शेतकऱ्यांचे शेतात कृषी पंपाची वीज जोडणी प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावे,शेतकऱ्यांचे शेतात कृषी पंपाची वीज जोडणी मागेल त्यास देण्यात यावे या मागण्या आहेत.
निवेदन देण्यात आल्यावर भ्रमणध्वनी वरून उपकार्यकारी अभियंता जळगावकर यांनी जीप सदस्य गजानन बुटके यांचे शी तात्काळ संपर्क करून त्यांनी कोणतीही आंदोलन करू नये व येत्या तीन दिवसात विदुयत पुरवठा खंडित होणार नाही आणि विद्युत पुरवठा सुरळीत राहणार असल्याचे लेखी पत्र त्यांनी सहाययक अभियंता गायकवाड मॅडम यांच्या माध्यमातून दिले आहे
निवेदन देत असताना सुनील दाभेकर ,प्रमोद दांडेकर सचिन पचारे माजी सरपंच संजय चौधरीस्वप्नील लांडगे अमोल गोडे आदी उपस्थित होते.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here