१०१ युवकांच्या रक्तदानाने गिरीधर काळेंच्या लोकसेवेला सलाम सुवर्णमहोत्सवी सोहळा, कोरपना येथे स्टुडंट फोरम गृप व मित्रमंडळाचे आयोजन

0
92
Advertisements

कोरपना : कोरपना तालुक्यातील बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या सुवर्णमहोत्सवी ५० व्या वाढदिवसानिमीत्य कोरपना येथे श्रीकृष्ण सभागृहात भव्य रक्तदान शिबीर पार पडले. स्टुडंट फोरम गृप व गिरीधर काळे मित्रमंडळाच्या माध्यमाने तालुक्यातील १०१ युवकांनी रक्तदान करुन समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या लोकसेवेला सलाम केला. डॉ.काळे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे मत कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य संजय ठावरी यांनी व्यक्त केले.

मागील चार वर्षांपासून समाजसेवक डॉ.गिरीधर काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर तालुक्यातील विविध गावात घेण्यात येते. यंदा स्टुडंट फोरम गृपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

समाजसेवक डाॅ.गिरीधर काळे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या हाडांवर निशुल्क उपचार करीत आहे. वयाच्या १६ व्या वर्षापासून आजतागायत ३४ वर्षे त्यांची प्रदीर्घ सेवा कोरपना तालुक्यातील बिबी येथे सुरू आहे. चार लाखांपेक्षा अधिक अस्थिरुग्णांवर त्यांनी यशस्वी उपचार केले आहेत. पुण्या-मुंबईसह परराज्यातूनही रोज शेकडो अस्थिरुग्ण त्यांच्याकडे येतात. विदेशातील ‘इटली’ येथील महिलेने देखील मागील वर्षी त्यांच्याकडे उपचार घेतले. व्यवसायाने शेतकरी असलेले गिरीधर काळे रोज साधारणता आठ ते दहा तास अस्थिरुग्णांची निशुल्क सेवा करत आहेत. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेले काळे यांना त्यांच्या वैद्यकीय सेवेमुळे ग्रामसभेने त्यांना ‘डाॅक्टर’ हि उपाधी दिली. देशातील हा पहिलाच ऐतिहासिक निर्णय ठरला. कार्यक्रमाचे संचालन प्रतिक कोरडे, प्रास्ताविक निलेश मालेकर तर आभार दिनेश ढेंगळे, राजेश खामनकर यांनी मानले.

सोशल डिस्टंड, मास्क वापरातून शासकिय नियमांचे पालन

रक्तदान शिबीरात युवकांचा प्रतिसाद पाहता शासकीय नियमांचे तंतोतंत पालन आयोजकांकडून करण्यात आले. येणा-या प्रत्येकांचे सॅनिटायजर करण्यात आले. रक्तदानात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टंड ठेवण्यात आले. प्रत्येकाला मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोना महामारीतील लाॅकडाॅऊन काळात १०१ युवकांनी रक्तदान केले. या काळात ग्रामीण भागात जिल्ह्यातील हे मोठे रक्तदान शिबीर ठरले. यावेळी समाजसेवक डॉ.गिरीधर काळे व पं.स.सदस्य सविता काळे यांनी तालुक्यातील स्टुडंट फोरम गृप व युवकांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here