जलयुक्त कामांचा गोंधळ “लय भारी” पावसाच्या पाण्यात अदृष्य होण्याची शक्यता, वनक्षेत्रातील कामाला दोषी तरी कोण?

0
60
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
जिवती तालुक्याच्या निर्सगरम्य,डोंगर पायथ्याशी वसलेल्या धनकदेवी,कारगाव (खु) येथे पानलोट शिवारात जलयुक्त कार्यक्रमाअंतर्गत ढाळीचे बांध अर्धवट असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती.मात्र आता मातीनाला बांध मंजूर कामे घाईगर्दीत करण्याचा प्रयत्न सुरू असून चुकीच्या ठिकाणी अंदाज पत्रकात नमूद बाबी नुसार कामे होत नसल्याची कुजबूज गावात होताच कामावर असलेली पोकलैन मशीन हलविण्यात अली.पानलोट क्षेत्राच्या बाहेर वनक्षेत्रात कुंपण 34 पाटागुळा येथे काम झालेच कसे ? या कामाचा स्थळ निरीक्षण अंदाजपत्रक तयार करताना तांत्रीक व प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीने घेतली काय ? या कामाचा दर्जा निकृष्ट व अदांज पत्रकाप्रमाणे झाला नसल्याने याचा लाभ नेमका कुणाला.शेतकऱ्यांना की कृषी विभागाला असा प्रश्न उपस्थीत केल्या जात आहे.कारगाव येथील मुळ कंत्राटदारांनी पेटी कंत्राट म्हणून जिवती परिसरातील कौदेपूर येथील एका व्यक्तीला काम दिले.स्थळ दर्शक ठिकाणी ले-आऊट दिल्यानतंरच काम सुरू झाले.असे असताना कत्रंटदाराला जबाबदार धरून तो मी नव्हेच अशी भुमिका कृषी विभाग पार पाडत असून पळवाट काढण्याची धडपड सुरू असल्याचे आरोप होत आहे.मात्र गट निहाय अर्धवट कामे असताना 100 टक्के निधी धाळीच्या कामांवर झाला कसा,याच्या चौकशीची मागणी गावकऱ्यानी आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्याची माहिती असून सदर बांध वरूण राजाच्या कृपेने अदृष्य झाल्यानतंर मोजमाप होणार की चौकशी करून चुकीच्या बांधकामाला जबाबदारांवर कार्यवाही होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here