धरेवर पोहचल्या रोहणीच्या सरी, तपत्या उष्णतेत थंडा थंडा कुल कुल

0
110
Advertisements

गणेश लोंढे / कोरपना
कोरपना तालुक्यात तसे तर मागील दोन तीन पासुनच आभाळात काळ्या ठगांची उपस्थिती जावून थोडा़ थंडावा वाटू लागला होता रात्रीच्या वेळी काही सौम्य पावसाच्या सरी पडून मातीच्या खमंग सुगंधाने दिवसाची सुरुवात मागील दोन तीन पासूनच काळ्या ढगांनी सुर्यदेवतेचे दर्शन घडू देता संपूर्ण नभावर आपले एकछत्री राज्य गाजवायला सुरुवात केली व काल रात्री आठ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली व रोहणीच्या सरी धरे वर पडू लागल्या व वातावरण थंडा थंडा कुल कुल होऊण अंगावर शहारे ओढणारे गार वारे वाहु लागले.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागु असलेल्या लाँकडाऊन मुळे पर्यावरणाचा पुर्ण कस भरुन निघाल्याचे बोलल्या जात असुन त्याचा साकारात्मक परिणाम ही रोहणीच्या पहिल्या पहिल्या सरीतुन दिसून येत असल्याने यावर्षी पाऊसही समाधानकारक होण्याची शक्यता असल्याने बळीराज्याच्या चेहर्यावर आज जरी खुशी दिसत असली तरी निसर्ग राजा पुढे काय खेळी खेळतो हे त्याचे त्यालाच ठाऊक आणी बळीराजा आपल्या रानात पेरणीच्या तयारीला लागला असुन मु्ग नक्षत्रा आधी रोहणीचा पाणी व कपाशीची लागवड करणे फायद्याचे असे अशी परंपरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here