मूल येथील युवक कोरोना पॉझिटिव्ह, ऍक्टिव्ह रुग्ण 3, एकूण 25 रुग्णांची नोंद

0
109
Advertisements

चंद्रपूर – हरियाणातील गुडगाव येथून आलेल्या चंद्रपूर जिल्हयातील मुल येथील तीस वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या २५ झाली आहे.

२५ मे रोजी हरियाणातील गुडगाव येथून सदर व्यक्ती नागपूरला विमानाने आले. नागपूर वरून स्वतःच्या वाहनाने मूल येथे आल्यानंतर त्यांना गृह अलगीकरण करण्यात आले. 3 जून रोजी गृहअलगीकरणामध्ये असताना त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. आज तो पॉझिटिव्ह आला असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सहा सदस्यांचे देखील आज स्वॅब घेण्यात येणार आहे. सदर व्यक्तीला चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.
चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक रुग्ण ), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) व २४ मे ( एकूण रूग्ण २ ) २५ मे ( एक रूग्ण ) ३१ मे ( एक रुग्ण ) २जून ( एक रूग्ण ) ४ जून ( एक रुग्ण )अशा प्रकारे जिल्हयातील रुग्ण २५ झाले आहेत.आतापर्यत २२ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २५ पैकी अॅक्टीव्ह रुग्णाची संख्या आता ३ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here