कोरोना काळात मनसेच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे केले सर्रासपणे उल्लंघन

0
178
Advertisements

चंद्रपूर – संपूर्ण देशात कोरोना विषाणूची दहशत असताना राज्यात व जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा सह 144 कलम लागू करण्यात आली आहे, सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम घेण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे.

परंतु राज्य शासन, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला डावलून चंद्रपुरात मनसे ने वेकोलीच्या भटाळी येथील जीएनआर कंपनीवर हल्ला बोल आंदोलन केले.

Advertisements

स्थानिकांना रोजगार द्यावा अशी मनसे शहरध्यक्ष मनदीप रोडे यांची मागणी होती, त्यांनी काही काळ कंपनीचे काम सुद्धा बंद पाडले, या आंदोलनात 100च्या वर नागरिकांनी एकत्र येत 144 कलमाचे उल्लंघन केले.

सोबत सोशल डिस्टनसिंग नियमांची ऐसीतैशी केली, विशेष म्हणजे याबाबत पोलिसांना काही माहितीच नव्हती आंदोलनाच्या 1 दिवसानंतर पोलिसांना या आंदोलनाची माहिती मिळाली, मनसे पदाधिकाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे सोडून पोलीस फिर्यादी शोधत बसले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here