Advertisements
चंद्रपूर – देशात कोरोना विषाणूच्या सावटाखाली नागरिक जगत आहे, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या पण वाढत आहे, शासन, प्रशासन नेहमी नागरिकांना सॅनिटायझर, मास्क व सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करीत आहे.
अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुलांना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश सोलापन, महासचिव पुरुषोत्तम चौधरी, सचिव विनोद पन्नासे, वृत्तपत्र विक्रेता संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.