BOI वनसडी येथे भाजपतर्फे सॅनिटायजर,मास्क,डेटॉल साबण वितरीत, कोरोनाच्या धर्तीवर हिवरकर यांचा कौतुकास्पद उपक्रम

0
27
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका भाजपच्या वतीने कोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचावासाठी भाजप तालुकाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर यांनी BOI शाखा वनसडी येथील मॅनेजर शेख मंजूर हुसैन यांना सॅनिटायजर,मास्क व डेटॉल साबणाचे वाटप केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवरकर यांचे हे कार्य नागरिकांच्या आरोग्याविषयी लाभदायक ठरणार असून बँक कर्मचार्‍यांसह याठिकाणी उपस्थीत ग्राहकांना सुद्धा सॅनिटायजर,मास्क वाटप करण्यात आले.यावेळी हिवरकर यांच्यासह शाखा व्यवस्थापक शेख,शेंडे, प्रेमजी,डॉ.प्रमोद परचाके इतर कर्मचारी व नागरिकांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here