आप चे ऑनलाइन आंदोलन, #वीज बिल माफ करा, आंदोलनाला चंद्रपूर जिल्हावासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0
107
Advertisements

चंद्रपूर – कोऱोणाच्या महामारी मुळे सततच्या लाॅकडाऊन मुळे सामान्य माणसे हैराण झाली आहे. राज्यातील विज बिल धारकांचे विज बिल माफ करावे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने राज्यभर ऑनलाइन माध्यमाचा वापर करीत केली.
#वीज_बील_माफ_करा हा हॅश टॅग वापरून राज्यभर ट्विटरवर हजारो नागरिकांचे वीज बिल माफ करा या मागणीचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले.तसेच फेसबुक , वाट्सअप वरून सुद्धा हे आंदोलन चंद्रपूर जिल्हा आदमी पार्टीच्या वतीने ही करण्यात आले
आज मा.जिल्हाधिकारी याना जिल्हा
अध्यक्ष सुनिल देवराव मुसळे यांचे नेञ्रुत्वात निवेदन देण्यात आले. याप्रसंगी भिवराज सोनी ,राजू कुडे ,संतोष दोरखंडे ,विशाल भाले ,सपना विश्वकर्मा, सुनील भोयर योगेश आपटे , संदीप पिंपळकर प्रशांत पेरणे मयूर राईकवार सुखदेव दारूडे राजेश चेडगुलवार .बल्लारपुर येथे जिल्हा संघटक परमजीतसींग झगडे बलराम केसकर आसिफ शेख किशोर पुसलवार मुल येथे आम आदमी पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय सिध्दावार, गौरव शामकुळे, पियुष रामटेके, अमित राऊत प्रकाश चलाख यांनी तहसीलदार तसेच महावितरण च्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. सावली येथे सावली तालुका अध्यक्ष अनिल मडावी यांचे नेतृत्वात विज बिल माफी चे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.राजुरा येथे मिलींद गड्डमवार यांचे नेतृत्वात तसेच चिमूर येथे डॉक्टर अजय पीसे सिंदेवाही तालुक्यात आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते मनोहर पवार यांचे नेतृत्वात तालुका अध्यक्ष शशिकांत बतकमवार, शांतारामा आदे यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन वीजबिल माफीची मागणी करण्यात आली हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here