कोरपना येथे सिमेंट वाहनांचा थांबा बंद करा, कोरोनाच्या धर्तीवर नगरसेवक सोहेल अली यांची मागणी

0
97
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना हे ठिकाण तेलंगाणा,मराठवाडा राज्य व यवतमाळ जिल्हा सिमेलगत राष्ट्रीय महामार्गावर असून याच शहरातून तालुक्यातील सिमेंट कंपन्यातून इतर राज्य व जिल्ह्यात ट्रकांद्वारे सिमेंटची वाहतूक होत असते.यात काही गैर नाही मात्र ये-जा करणारे वाहन येथील मुख्य चौकात रस्त्यालगत उभी करून चालक,वाहक याठिकाणी थांबत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.यामुळे कोरोना संसर्गाची भीती निर्माण झाली असून सध्याच्या परिस्थीतीत सदर बाब अत्यंत धोकादायक असल्याचे मत व्यक्त होत आहे.याठिकाणी सिमेंट भरलेले व खाली करून येणाऱ्या ट्रकांचा थांबा तातडीने बंद करावा अशी मागणी कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सैय्यद सोहेल आबीद अली यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी व ठाणेदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here