Advertisements
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे तब्बल 24 रुग्णांची नोंद झाली असली तरी आतापर्यंत एकूण 22 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे.
2 जून ला एका 36 वर्षीय इसम हा कोरोना पॉझिटिव्ह मिळाला, शहरातील शिवाजी नगर, जुनोना रोड येथील वास्तव्यास असलेला इसम 2 दिवस आधी मुंबई वरून चंद्रपूरमध्ये आला होता.
तो इसम पॉझिटिव्ह मिळाल्याने शिवाजी नगर परिसरातील काही भाग प्रशासनातर्फे सील करून, निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू झाले, विशेष म्हणजे त्या रुग्णाच्या घरी एक दिवसआधी बचत गटातील महिलांची मिटिंग झाली होती.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या संपूर्ण महिलांची माहिती घेत त्यांना सुद्धा कोरेन्टाईन करणार अशी माहिती दिली आहे.