विनाअनुदानित खाजगी इंग्रजी शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन कोरोना आपत्कालीन फंडातून मंजूर करावे

0
69
Advertisements

चंद्रपूर – राज्यातील खाजगी विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत (कॉन्व्हेंट )शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व स्कूल बस वाहन चालक कर्मचारी मिळून दहा लाख कर्मचारी कार्यरत आहे. या शाळा विनाअनुदान तत्त्वावर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या फी मधून संस्था कर्मचाऱ्यांचे वेतन करीत असते. परंतु कोरोना महामारी मुळे देशातील तसेच राज्यातील अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचा व्यवसाय ठप्प झाला व अनेक पालकांना आपल्या नोकरी गमवाव्या लागल्या ,अनेकांना वेतन मिळेनासे झाले. त्यांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या फि वर झाला. यामुळे पालकांनी शाळेत विद्यार्थ्यांची फी भरली नाही. वरील प्रकारामुळे शाळा संस्थेत आर्थिक संकट आले आहे.

अनेक संस्थाचालक यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व स्कूल बस वाहन चालक कर्मचाऱ्यांचे वेतन करू शकत नाही आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे.
माननीय महोदय हे सर्व कर्मचारी व त्यांचा परिवार या देशातील ,या राज्यातील नागरिक आहे .त्यांची उपजीविका चालवण्यासाठी आपले, सरकार म्हणून कर्तव्य आहे .तरी या या विनाअनुदानित खाजगी इंग्रजी माध्यम शाळा (कॉन्व्हेंट) च्या शाळेतील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल बस वाहन चालक कर्मचारी च्या वेतनासाठी शाळेला कोरोना आपत्कालीन फंडातून अनुदान मंजूर करावे व त्यांची उपासमार थांबवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कुल तर्फे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here