नो स्कुल, नो फिस मोहीम, 3 महिने शाळा, कॉन्व्हेंट बंद, तर मग फी द्यायची कशाला?, युवासेनेचं शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

0
224
Advertisements

चंद्रपूर –  कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र देशात हाहाकार माजलेला आहे. कोविड 19मूळे संपूर्ण देश, राज्य आर्थिक अडचणीचा सामना करीत आहे अश्या परिस्थितीमध्ये मागील काही महिन्यापासून सामान्य नागरिकांचा रोजगार ठप्प झाल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना त्यांना करावा लागत असतांना आता आपल्या मुला बाळांच्या शिक्षनाच्या चिंतेने पालकवर्ग चिंताग्रस्त झालेला आहे.यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेता युवासेना चंद्रपूर शिष्टमंडळामार्फत शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात,युवासेना जिल्हा समन्वयक इंजि. निलेश बेलखेडे यांच्या नेतृत्वात,मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन, चंद्रपूर शिक्षणाधिकारी मा. डोर्लीकर साहेब, चंद्रपूर शिक्षण विभाग नोडल अधिकारी पवार साहेब (प्राथमिक ),नोडल अधिकारी पूनम मस्के मॅडम (माध्यमिक )यांची भेट घेण्यात आली यावेळीं अश्या कोरोना संकट काळातील बिकट परिस्थितीमध्ये शासनाच्या निर्णयायानंतर शाळा, महाविद्यालये बंद असतांना सुद्धा आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या आदेशानंतर हि, काही संस्थाचालक प्रवेश प्रक्रिया राबवून अतिरिक्त फी वाढ करीत असून ऑनलाईन शिक्षणाचं कारण देत विविध फी,शालेय कपडे, पुस्तके साहित्य घेण्यास सक्ती करीत आहेत अश्या विविध तक्रारी युवासेना चंद्रपूर कळे येत आहेत. समोर येऊन तक्रार केल्यास, या विरुद्ध आवाज उठवल्यास तक्रार केल्यास आपल्या पाल्यांला नाहक त्रास सहन करावा लागेल या भीतीने पालकवर्ग हा त्रास सहन करीत आहेत.

साधारणतः 2-3महिन्यापासून शाळा, महाविदयालये बंद असून काही मध्ये परीक्षा सुद्धा होऊ शकलेल्या नाहीत अश्या परिस्थितीमध्ये या शाळा सुरु होईपर्यंत, शाळा, कॉन्व्हेंट मध्ये आकारण्यात येणारी 3 महिन्याची फी माफ करण्यात यावी या मागणी चा पाठपुरावा शासनापर्यंत करावा शी विनंती केली तसेच अवाजवी वार्षिक फी वाढीव करण्याऱ्या,फी भरण्याकरिता पालकांना सक्ती करणाऱ्या संस्थावर कारवाई करून पालकांना यातून दिलासा देऊन त्यांना थोड्या का होईना प्रमाणात चिंतामुक्त करण्यात यावे हि विनंती निवेदन युवा सेना चंद्रपूर मार्फत देण्यात आले. यावेळीं निलेश बेलखेडे यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर विषयाचं गांभीर्य ओळखून अश्या तक्रारीनुसार संस्थेवर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळीं जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांच्याकळून देण्यात आले.

Advertisements

पालकांनी सुद्धा न घाबरता अश्या तक्रारी असल्यास शिवसेना कार्यालय किंवा युवासेना पदाधिकारी जिल्हा, चंद्रपूर यांच्या पर्यंत पोहोचवाव्या असे आव्हान इंजि. निलेश बेलखेडे यांनी केले आहे. यावेळीं या शिष्टमंडळात युवासेना शहर प्रमुख अक्षय अंबिरवार, उपशहर प्रमुख करण वैरागडे, संकेत बनकर, यांची उपस्तीथी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here