पिट्टिगूडा 1 व 2 येथे जलयुक्त शिवाराच्या कामात घोळ, निष्पक्ष,निस्वार्थ चौकशी व्हावी, नागरिकांची मागणी

0
98
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
तेलंगणा राज्य सिमे लगत महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या आदिवासी,अतिदुर्गम, मागासलेला जिवती तालुका येथे दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मृदु व जल सुधारणांची कामांना मोठ्याप्रमाणात मंजूरी दिली. मागील 10,15 वर्षांत मानव विकास मिशन,जलसंधारण,एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम,रोजगार हमी योजना इत्यादी योजनेतून विकास कामे करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.तत्कालीन शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रमात पिट्टिगुडा क्रं.1 येथे धाळीचे बांध गट क्रं.1व 2,माती नाला बांध गट क्रं.1ते 6,सिमेंट नाला बांध गट क्रं.1व 2 तसेच पिट्टिगुडा क्रं.2 येथे धाळीचे गट क्रं.1माती नाला बांध गट क्रं.1ते 6,सिमेंट नाला बांध 2 अशी कामे जलयुक्त शिवारात मंजूर करण्यासाठी आराखडा,आरसीपी व स्थळ दर्शक निरीक्षण न करता पाशान,अवघड दगड अशा अयोग्य ठिकाणी बांधकाम करण्याचा पराक्रम कृषी विभागाने केल्याचे आरोप होत असून याचा लाभ गावातील नागरिकांना झाला नाही.पाणलोट क्षेत्रात भौगोलिक क्षेत्र निश्चित केलेल्या ठिकाणी बांधकाम झाले नसल्याचे बोलले जात असून अनेक स्थळ दर्शक ठिकाणी कामे झाली नसून हे क्षेञ वनविभागाचा असताना वनविभागाने वन तलावाच्या नावाने माती बांध बांधले.या संपूर्ण कामात मोठा घालमेल असून 12 माती नाला बांध झाले का ? स्थळ दर्शक बांधले का ? ही बाब शंका निर्माण करणारी असल्याचे मत व्यक्त होत आहे.तसेच धाळीचे बांधकाम अंदाज पत्रकाप्रमाणे प्रत्यक्ष निश्चित सर्व्हे नंबर मध्ये झाली नाही.उपविभागीय कार्यालयापासून तालुका कृषी अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या टक्केवारीच्या नादात जिवती तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याची बोंब सुरू आहे.तसेच निविदा कंत्राटदारांनी 15 ते 25 टक्के दर कमी केल्याने तसेच अंदाज पत्रकातील 30 ते 35 टक्के दर कमी झाल्याने काम निकृष्ट दर्जाचे झाले. अनेक ठिकाणी तर चक्क कामेच चोरीला गेल्याने याविषयी निष्पक्ष,निस्वार्थ चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र आता चौकशीला केव्हा सुरूवात होणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here