कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांना राष्ट्रवादी कांग्रेसने दिला मदतीचा हात

0
103
Advertisements

चंद्रपूर – चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे बालाजी वॉर्ड इथिल गोपालपुरी, कंटनमेंट झोन मध्ये असलेल्या गरजू लोकांना जीवनाशयक धान्य किटचे वाटप (सोशल distancing करून) करण्यात आले. बालाजी वॉर्ड , गोपालपुरी इथिल एक रुग्ण कोरोना positive आढळून आले असतांना प्रशासनाने हा वॉर्ड प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केल्याने येथील नागरिकांना जिवनाशयक वस्तूचा तुटवडा जाणवला. ही बाब,बालाजी वॉर्ड येथील राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष निमेश मानकर यांना माहीत होताच, त्यांनी काल रात्री इथे भेट दिली तसेच येथील नागरिकांची प्रमुख अडचण लक्षात घेतली. याबाबत त्यांनी शहराध्यक्ष राजीव कक्कड यांना संपर्क साधला असता त्यांनी त्या परिसरात येऊन पाहणी केली आणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिवनाशयक धान्य किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष राजीव कक्कड ,विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी शिक्षक संघटना अध्यक्ष निमेश मानकर, संजयजी तुरीले, , आकाश मेले , प्रशांत चिपावर तसेच वॉर्डातील नागरिक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here