भाजपतर्फे मोफत जनधन खाते शिबिर संपन्न

0
224
Advertisements

विक्की गुप्ता

घुग्गुस – येथील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतिने घुग्गुस परिसरातील महिलांना जन-धन खाते काढुन देण्यात येत आहे.

Advertisements

आज रविवारला सकाळ पासुन जन-धन खाते उघडण्याची सुरवात करण्यात आली. घुग्गुस येथील बॅक आॅफ इंडिया शाखेचे व सेंट्रल बैंक ऑफ इंडिया या दोन बॅकांचे खाते उघडण्यात आले. यावेळी तब्बल ३५४ महिलांचे जन-धन खाते उघडण्यात आले.

चंद्रपुर जिल्ह्याचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांचा माध्यमातुन घुग्गुस येथे जन-धन खाते उघडण्यात येत आहे. घुग्गुस बॅक आॅफ इंडिया शाखेचे व सेंट्रल बैंक ऑफ इंडिया शाखेचे व्यवसाय प्रतिनीधी सुनील सिंग आणी अमीत सिंग यांनी जन-धन खाते काढुन दिले आहे.

या शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हे शिबिर जून महिन्याच्या प्रत्येक रविवारला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत घेण्यात येणार आहे.
तरी घुग्गुस परिसरातील महिलांनी जन-धन खाते उघडण्याचा लाभ घ्यावा असे आव्हान घुग्गुस भाजपा चे शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here