पोरक्या झालेल्या सपनाचं काय? शासकीय मदत मिळणार का?

0
234
Advertisements

तळोधी बाळापूर
तळोधी अप्पर तालुक्यातील नांदेड येथील विधवा महीला मंगला रमेश राऊत ( वर्ष ३२) हीचा भरदुपारी राहते घरी निर्घून हत्या करण्यात आली. यामुळे पोरकी झालेल्या सपना(१२)हीला शासकीय योजनांचा सर्वोतोपरी लाभ मिळावा तसेच मानसीक समुपदेशन करावे म्हणून चंद्रपूर जिल्हयातील संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी भेंट दिली.  सपनाची कौटूंबिक माहीती घेवून मानसिक समुपदेशन केले.
कोरोणा रोगाचे लौकडावून काळात गंभीर स्वरूपाचे गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसत असतांनाच तळोधी अप्पर तालूक्यातील नांदेड़ गावातील मंगला राऊत(३२) या विधवेचा राहत्या घरी गावातील माथेफिरू मनोज मेश्राम (४३)याने भरदूपारी गळा आवळून खून केला व परीसरात खळबळ माजली होती.या प्रकरणाची माहीती मिळताच तळोधी येथील शिक्षक हरीशचंद्र पाल यांनी सहायक पोलीस इनेस्पेक्टर रोषण सिरसाट यांचेकडून सविस्तर‌ माहीती घेतली. त्यातून कु.सपना(१२) पोरकी झाल्याचे निदर्शनास आले. सपनाचे भवितव्य लक्षात घेत हरीशचंद्र पाल यांनी जिल्हा संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांचेशी संपर्क करून सविस्तर माहीती कथन केली.

साखरकर यांनी सुद्धा विलंब न करताच जिमबाविअ श्री.टेटे साहेब यांची परवानगी घेवून सायंकाळी तळोधीला पोहचले व सोबत पोलीस उपनिरीक्षक साखरे, शिपाई नेवारे, सामाजिक कार्यकर्ता हरीशचंद्र पाल व राजेश भिवदरे संरक्षणअधिकारी याचेसमवेत नांदेड़ येथे सपनाचे घरी भेंट दिली व सपनासह तिचे नातेवाईक आणि शेजारी यांचे सोबत चर्चा करुन शासकीय विविध योजनांची माहीती दिली व शासकीय बालगूहात प्रवेश देवून शिक्षणासह सर्व पालन-पोषण करण्याची जवाबदारी घेण्यास तयार असल्याचे सांगीतले परंतू सपनाची आजी चंद्रकला राऊत हीने मी सपनाला दूर करणार नाही व तिचे स्वता संगोपण करण्याचे सर्वासमक्ष मान्य केले.
यावेळी सपना व तीचे आजीचे मानसीक समुपदेशन करून सर्वोतोपरी शासकिय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे साखरकर यांनी सांगीतले.
याकरीता सहायक पोलीस निरीक्षक रोशन सिरसाठ यांनी सुद्धा योग्य ते सहकार्य करणार असल्याचे साखरकर यांना सांगीतले.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here