बळीराजाचा ससेमिरा संपता संपेना, यादीतून नावे गहाळ तर कापूस घरातच पडुन, नोंदनी नाही त्यांचे काय ? आबीद अली यांचा सवाल

0
110
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
अस्मानी व सुलतानी संकटात सापडून नेहमी बळीराजाची कुचंबणा होत असल्याचे पहायला मिळते.बळीराजाचा ससेमिरा संपता संपेना अशी अवस्था असून कापूस विक्रिच्या प्रश्नावरून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी चार दिवसापुर्वी कोरपना तालुक्यातील सोनुर्ली येथे रस्ता रोको आंदोलन पुकारले होते.हा तिढा सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनाचे याकडे लक्ष वेधले.परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित दहा पथके नेमून गावोगावी तपासणी मोहीम राबवून अचूक अशी यादी तयार करण्याचे आदेश दिले.ज्यांची नावे यादीत समाविष्ट आहे अशांच्या घरी जावून साठा असलेल्या कापसाचे फोटोसेशन संबंधित विभागाकडून झाले.कित्येक शेतकऱ्यांनी 13 व 14 तारखेला कृउबासकडे नावाची नोंद केली.पिपर्डा येथील देवराव कुडमेथे,सोनू तिखट,संदीप सोयाम.तळोधी,खैरगाव येथील बापूराव शेंडे,शांताबाई शेंडे.कोरपना येथील संभा भूसारी या शेतकऱ्यांचे नावच यादीत नसल्याने पून्हा यादीचा घोळ उघड झाला आहे.यामूळे अनेक शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करत कापूस विक्रीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.ऑनलाईन नोंदी असताना फेर पडताडणी यादीत नावे का सुटली याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.यापुर्वी कापूस नसताना अनेक नाव यादीत समाविष्ठ करून आकडा फुगविण्यात आला.मात्र गरजू व खरा शेतकरी अजूनही अडचणीतच आहे.प्रशासन युद्धपातळीवर कार्य करीत असले तरी यादीच्या घोळामुळे बळीराजा पुरता वैतागला आहे.शेतकऱ्यांपेक्षा किरकोळ कापूस व्यापाऱ्यांनीच अधिक लाभ उचलला असे आरोप होत आहे.उत्पादनापेक्षा जास्त कापूस आला तरी कुठून हा मात्र संशोधनाचा विषय ठरत आहे.अनेक अडचणींचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पडक्या दरात खरेदी करून व्यापाऱ्यांनी संधीचे सोने केले तर जिनिगं धारकांना कमी दरात कापूस खरेदी करून आपापल्या स्नेही मित्र परिवाराच्या नावाने गत 1 महिन्यात ग्रेडर्सच्या संगनमताने विक्री केल्याची चर्चा शेतकऱ्यांत रंगू लागली आहे.टोकन घोळ संपुष्टात आणून सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात यावा.यंदा वेळेवर वरूण राजाची कृपा होत असल्याचे पाहून शेतकरी वर्गात हंगामाची लगबग व कापूस विक्रीची चिंता वाढली आहे.याच पार्श्वभूमीवर जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी शेतकऱ्यांसह कोरपना तहसीलदाराची भेट घेऊन यादीचा घोळ निदर्शनास आणून दिला याबाबत संबंधितांना सूचना करून गाव निहाय अचूक माहिती सादर करण्याचे निर्देश यावेळी तहसीलदारांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here