लॉकडाउन काळात गरजूंच्या मदतीला धावणारा ध्येयवेडा विपुल

0
207
Advertisements

चंद्रपूर – फक्त 20 वर्षे वय असलेला… कोवळ्या वयातील विपुल रंगारी हा प्रबोधन विचार युवा मंच चा सक्रिय युवा संयोजक.आहे…….
देशात कोरोनाचा संघर्ष सुरू आहे… लॉकडाऊन ला दोन महिने झाले… आणि या लॉकडाऊन च्या काळात हातावर आणून खाणाऱ्या लोकांचे देशभरात अतोनात हाल होत आहे.

सुरवातीच्या काळात बऱ्याच समाजहिताची जाणीव असणाऱ्या संघटना ,लोकांनी अडचणीत असलेल्या लोकांना सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले….

Advertisements

परंतु लॉकडाऊन चा काळ जसा जसा वाढत गेला तसे तसे गरजू, अडचणीच्या लोकांना अन्नधान्य व इतर गरजेच्या वस्तूची गरजही भासत होती……

लॉकडाऊन असल्यामुळे हाताला कामही मिळत नव्हते….

*या सर्व परिस्थितीचा विचार करून प्रबोधन विचार युवा मंच चा युवा संयोजक विपुल रंगारी यांनीही अडचणीत असलेल्या लोकांना सहकार्य मिळवुन देण्यासाठी पुढाकार घेण्याचे ठरविले* ..

याची सुरुवात म्हणून स्वतःहा युवा मंच च्या युवा संयोजकांना संपर्क साधून 10 rs पासून कितीही सहकार्य करू शकता अशी संकल्पना काही युवा संयोजकांसमोर ठेवली आणि लगेच…..

*विपुल च्या या संकल्पनेला साथ सहयोग म्हणून युवा संयोजकांनी स्वतःकडून 5000 rs गोळा केले ( स्वतःचे पैसे मिळून) आणि त्या पैश्यातून अडचणीत असलेल्या लोकांना गरजेच्या वस्तू म्हणजेच तांदूळ, गहू, डाळ, तेल, साबण (कपड्यांची, भांड्याची, अंघोळीची, ) डोक्याच तेल, टूथपेस्ट, इ. वाटप केले* …..

*वाटप करताना कुठल्याही प्रकारचे फोटोशेषण करण्यात आले नाही …. तसेच फिजिकल डिस्टन्स ठेवून आणि पूर्ण काळजी घेऊनच अडचणीतील लोकांना सहकार्य केले हे विशेष*

मुख्य म्हणजे सहकार्य देताना ” *हे आमचं कर्तव्यच आहे कारण, ..एखाद्या घरी जर दोन भावंड असेल आणि एक भाऊ कमवित असेल आणि दुसऱ्या भावाला काही मदत करीत असेल (अडचणीत आहे म्हणून) ज्याप्रमाणे हे कर्तव्य होय
अगदी त्याच प्रमाणे हेही कर्तव्यच होय*….

असे सांगून…. पुढे बोलताना म्हणतो की… *हे तुमच्यावर उपकार नाही तर हे उधार आहे असे समजा आणि भविष्यात एखाद्या गरजूला जर तुम्ही सहकार्य कराल तर हे उधार तुम्ही परतफेड केले असे समजा* ..

वाटप करताना अडचणीत असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरील हास्य बघून विपुल चे मन भरून आले आणि मग सहकार्यासाठी लोकांशी संपर्क करणे सुरू झाले…

*आणि अश्याप्रकारे 12 मे पासून आजपर्यंत सतत लोकांशी फोनद्वारे संपर्क करून आतापर्यंत 50000 rs (पन्नास हजार रुपयांचे ) सहकार्य मिळवून अडचणीत असलेल्या लोकांना सहकार्य करणे सुरू आहे* …..

विपुल रंगारी हा मूळचा भद्रावती येथील असून चंद्रपुर येथे मामाकडे असतो… विपुल 19 वर्षे वयाचा असून बजाज पोलीटेक्निक ला मेकॅनिकल इंजिनिअर चा विद्यार्थी आहे…..

*गेल्या दोन वर्षांपासून चंद्रपुरात प्रबोधन विचार युवा मंच तर्फे सामाजिक परिवर्तनाचे कार्य जोमात सुरू आहे… मुख्यता भारतीय संविधानाचे महत्व लोकांत रुजावे म्हणून युवा मंच ची निर्मिती करून युवकांमध्ये देशहिताची भावना निर्माण होऊन सत्कार्य घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहे* ….

विपुल रंगारी हा सक्रिय युवा संयोजक म्हणून अतिशय प्रामाणिकपणे कार्य करीत आहे….. अतिशय महत्वाचे म्हणजे

*लोकांनी मेहनतीच्या मिळकतीतून वर्गणी च्या स्वरूपात विपुलला आर्थिक सहकार्य म्हणून दोन वर्षात बऱ्याच कार्यक्रमाला मदत दिली* …..

*परंतु वर्गणीच्या पैश्यातून चहा सुद्धा न पिण्याची शपथ सर्व युवा संयोजकांनी घेऊन प्रामाणिकता जपत आहे … त्यातला एक विपुल रंगारी* ……

*विपुल च्या प्रमाणिकतेचा वेळो वेळी प्रबोधन विचार मंच च्या कार्यक्रमात सन्मानही करण्यात आला आहे…. इतकेच नव्हे तर चंद्रपुरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ मा. डॉ. चेतन खुटेमाटे यांनी विपुल ला उच्च क्वालिटी चे दोन ड्रेस देऊन भरगच्च सभागृहात सन्मानही करण्यात आला आहे* …….

*झाकली मूठ सव्वा लाखाची* या म्हणीचा अर्थ विपुल रंगारी ला तंतोतंत लागू पडते…..

विपुल ला सहकार्य करण्यासाठी …डी आर इंजिनिअरिंग चे संचालक दिलीप वावरे, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर कपिल सरदार,
नेत्ररोग तज्ञ डॉ चेतन खुटेमाटे,
टिपू सुलतान फौंडेशन चे अध्यक्ष अमजद शेख,
टॅक्स प्रॅक्टिशनर नितीन डोंगरे, डॉ प्रफुल काटकर,
इंजि. दिनेश डोंगरे , डॉ विनोद माहुरकर,
स्कॉलर्स सर्च अकॅडमी चे संचालक दिलीप झाडे , इत्यादी शहरातील नामवंत लोकं विपुल च्या पूर्ण पाठीशी असूनही विपुल ने वयक्तिक स्वरूपात कधीही मदतीची अपेक्षा केली नाही आणि घेतलेलीही नाही……

विपुल ला डेंग्यू चे लक्षण होते इलाज करण्यासाठी प्रबोधन विचार मंच चे मुख्य संयोजक विनोद सोनटक्के यांनी 5000 rs नॉन रिफंडेबल तत्वावर जबरदस्तीने दिले तरी सुद्धा ….

बिमारीतून बरा झाल्यावर विपुल रंगारी यांनी त्याच 500च्या नोटा 5000 rs विनोद सोनटक्के यांना जबरदस्तीने परत घेण्यास भाग पाडले……. (स्वार्थी दुनियेत अजूनही प्रामाणिकता टिकून आहे ती म्हणजे विपुल रंगारी सारख्या लोकांमुळे)……..

प्रबोधन विचार मंच च्या कार्यक्रमाची मुख्य जवाबदारीच विपुल रंगारी कडे असते तरी सुद्धा प्रसिध्दीची लालसा न बाळगता इतरांना समोर करून स्वतः मात्र पडद्याआड लपण्याचा प्रयत्न करतो हे सर्वांनीच बघितले आहे………..

*विपुल च्या वयातील बहुतांश मुले पानठेल्यावर किंवा मुलीच्या मागे लागून करियर बरबाद करतांना दिसतात…. विपुलने मात्र आपल्या बालपणातील मित्रांनाही प्रबोधन विचार मंच शी जोडून समाजहिताची भावना त्यांच्यातही जागृत केलेली आहे* ….

आणि याच वयात विपुल समाजहिताची जाणीव ठेवून इतरांच्या सहकार्यासाठीही तत्पर असतो…..

विपुल हा स्वतःच होतकरू आणि गरजू मुलगा आहे.याही पेक्षा महत्वाचे म्हणजे विपुल हा अतिशय प्रामाणिक मुलगा आहे….. वडीलही मोलमजुरी करून जगतात……

अशी मुले जर शासन प्रशासनात गेली तर देशाचं चित्रच बदलेल…….. *प्रबोधन विचार मंच अश्या कोवळ्या वयातील युवकाच्या डोक्यात आणि मनात प्रामाणिकता रुजविण्यात यशस्वी होतांना दिसत आहे* ….

विपुल च्या कार्याचा गौरव हा सार्वजनिक स्वरूपात झाल्यास प्रामाणिक कार्य करण्याची इतरांनाही प्रेरणा मिळेल….

विपुलचा आदर्श घेऊन जर नव्या पिढीने विचार आणि कृती केल्यास नक्कीच देश घडेल……..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here