अवघ्या 24 तासात साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, चिमूर पोलिसांची धडक कारवाई

0
127
Advertisements

चिमूर – गुन्हे व गुन्हेगारीचा तात्काळ शोध घेण्यासाठी चिमूर पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे हे नेहमीच अग्रेसर असतात, 30 मे ला चिमूर येथील बामणी ला अज्ञात चोरांनी एका घरातून सोने व रोख रक्कम असा एकूण 5 लाख 44 हजारांचा मुद्देमाल चोरी झाला, या गुन्ह्याची तक्रार चिमूर पोलीस स्टेशनला दाखल होताच वेळेची तमा न बाळगता ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी तात्काळ आरोपी व मुद्देमाल जप्त केला.

पोलीस स्टेशन चिमूर येथे दि. 30/05/2020 रोजी फिर्यादी शंकर नथुजी बोबडे रा. बामणी ता.चिमूर यांचे घरी अज्ञात चोराने चोरी करून सोन्याच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेली असल्याने पोलीस स्टेशन चिमूर येथे अप क्र 192/2020 कलम 380 भा.द.वि. चा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक श्री स्वप्नील धुळे यांनी आपल्या पूर्ण कसोशीने व गोपनीय माहितीने गुन्ह्यात चोरी झालेल्या सोनाच्या वस्तू व रोख रक्कम असा एकूण 5,44,500 रु. चा मुद्देमाल अवघ्या 24 तासात हस्तगत केल्या असून श्री स्वप्नील धुळे ठाणेदार चिमूर यांचे सोबत सदर तपास सहापोनी मंगेश मोहोड ,पोउपनी अलीम शेख , पोउपनी राजू गायकवाड , पोहवा विलास निमगडे , नापोशी किशोर बोढे , बलदेव कुंभरे, पोशी सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, कुणाल राठोड, प्रमोद गुट्टे, सुशील आठवले यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here