चंद्रपूर – चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील 6 न. संचावर काम करत असतांना अपघात झाल्याने कंत्राटदार अडोरे यांचे चार कामगार जखमी झालेत. या कामगारांवर चंद्रपुरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी या कामगारांची भेट घेत त्यांच्या प्रकृती बाबत विचारना केली.
सदर कामगार नेहमी प्रमाणे आजही आपल्या कर्तव्यावर गेले. यावेळी संच क्रमांक 6 मध्ये त्यांचे काम सुरू होते. मात्र वर चढतांना ते अचानक खाली कोसळले. या अपघातात या कामगारांना मोठी दुखापत झाल्याने त्या चारही कामगारांना चंद्रपुरातील दोन वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही रुग्णालयात जाऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांच्या प्रकृती बाबत विचारणा केली आहे. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी या कामगारांचा उपचार करत असलेल्या डॉक्टरांचीही चर्चा केली असून कामगारांच्या प्रकृतीबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे विश्वजीत शाह, प्रकाश पडाल, हेरमन जोसेफ आदींची उपस्थिती होती.
आणि त्या जखमी कामगारांची विचारपूस करण्याकरिता एकचं जनप्रतिनिधी आले समोर
Advertisements