अबब….मुजोरी लाॅकडाऊनचा फायदा घेत न्यायप्रविष्ठ अतिक्रमित जागेवर बांधकाम सुरू, तात्काळ बांधकाम बंद करण्याची मागणी

0
200
Advertisements

गणेश लोंढे / नांदा फाटा

कोरपना तालुक्यातील नांदा ग्रामपंचायतीचे अंतर्गत येणार्‍या अकृषक शेत सर्वे क्रमांक १४ व सर्वे क्रमांक १५ या दोन्ही लेआऊट मधोमधील आवाजाहीचा ६.१० मीटर जागेवर कुठलाही मालकी हक्क नसतांना रामअवतार नावधंर यांनी अतिक्रमण केले २०१८ पासून प्रकरण तहसिलदार कोरपना यांचेकडे न्यायप्रविष्ट असतांना आता लाॅकडाऊन सुरु असल्याने प्रशासन लक्ष देणार नाही असे गृहीत धरुन अतिक्रमीत जागेवर
वाणिज्य वापराचे बांधकाम सुरु केले आहे सदरचे बांधकाम तात्काळ थांबवून कारवाईची मागणी ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी केली असल्याने तहसिलदार व ग्रामविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे

Advertisements

ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकार्‍यांची साथ असल्याने रामअवतार नावधंर यांनी २००१ मध्ये नागरिकांचा आवाजाहीचा रस्ता अतिक्रमण करून बंद केला ६.१० मीटर जागेवर अतिक्रमण करून सन २०१८ मध्ये पक्के वॉलकंपाऊंड करून वाणिज्य वापराचे बांधकाम सुरू केले होते या संदर्भाने ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी तहसीलदार कोरपना व ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याने तत्कालीन तहसीलदारांनी नावंधर यांचे बांधकाम तात्काळ बंद करुन प्रकरण दाखल केले होते सदर प्रकरण तहसीलदार यांचे कोर्टात अजूनही न्यायप्रविष्ट आहे २३ मार्चपासून लाॅकडाऊन सुरू आहे रामअवतार नावंधर यांनी लाॅकडाऊनमध्ये प्रशासन लक्ष देणार नाही असे गृहीत धरून अतिक्रमित जागेवर व्यावसायिक वापराचे हेतूने पक्के बांधकाम मागील सहा सात दिवसापासून सुरू केले आहेत ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकार्‍यांना ही बाब माहित असताना सुद्धा अतिक्रमीत जागेवरील नावंधर यांचे बांधकाम त्यांनी थांबविले नाही याऊलट नांदा ग्रामपंचायतीच्या महिला ग्रामपंचायत सदस्या प्रिया राजगडकर यांनी दखल घेऊन नावंधर यांचे अतिक्रमित जागेवरील बांधकाम तात्काळ थांबविण्याची मागणी तहसीलदार कोरपना व ग्रामपंचायतीकडे केली आहेत प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदरचे बांधकाम थांबवून कारवाई करणे गरजेचे आहे

सदर जागेबाबत वाद असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे कुठलीही परवानगी न घेता नावंधर यांनी सुरू केलेले बांधकाम बेकायदा आहे यासंदर्भाने बांधकाम तात्काळ बंदकरण्याची नोटीस बजावण्यात येत असून आवश्यक कारवाई करीता तहसिलदारांना माहीती पाठवित आहे.

पंढरीनाथ गेडाम
ग्रामविकास अधिकारी ,नांदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here