बोरगाव येथील दोन घराचे वादळाने छप्पर उडाले

0
188
Advertisements

कोरपना – रविवारी पहाटे च्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने तालुक्यातील
बोरगाव खुर्द येथील दोन घराचे छप्पर पूर्णता उडाले. सुदैवाने यात प्राण हानी टळली.
प्राप्त माहितीनुसार, बोरगाव खुर्द येथे सकाळी जोरदार पावसासह वाऱ्याच्या वेगास वादळ आल्याने घराचे छप्पर उडून पडले. सदर घरे दिलीप गौरकर, बापूराव कोडापे यांचे मालकीचे आहे. यात त्यांच्या
घरातील सामानांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली. घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी पचारे यांचे मार्गदर्शनाखाली येरगव्हण तलाठी कुळमेथे यांनी केला आहे.
त्यांना प्रशासनाने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here