कापुस खरेदीचा तिढा सुटणार, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशाने 48 तासात नवीन यादी होणार तयार

0
224
Advertisements

गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-

शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून जोर धरत आहे.असे असताना दोन दिवसापुर्वीच संतप्त होऊन शेकडो शेतकऱ्यांनी अचानकपणे सोनुर्ली जवळील कापुस खरेदी केंद्रा समोरील महामार्ग बंद करून रस्ता रोको केला.शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहून शासन प्रशासनात एकच खळबळ उडाली.पोलिस विभाग,बाजार समिती, लोकप्रतिनिधी यांनी मध्यस्थी करून तात्पुरता तोडगा काढल्या नंतर अखेर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतला.मात्र आता नविन यादी तयार करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांच्या आंदोलनला यश प्राप्त झाल्याचे बोलले जात असून कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या त्या फेर तपासणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे यांना निर्देश देवून गटसचिव,तलाठी व ग्रामसेवकांचे असे 10 पथक तयार करून गावोगावी जावून शेतकऱ्यांकडील मालाची तपासणीला सुरवात करण्यात आली.लगेच सदर अहवाल 48 तासात नविन यादीच्या रूपात येणार असून यापुर्वीची जी यादी होती त्याची डीडीआर यांनी तपासणी केली.यामध्ये अचुक यादी तयार व्हावी या हेतूने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला.त्यानुसार लवकरच संपूर्ण यादी तयार करून ज्या शेतकऱ्यांचे टोकन जुन्या यादीत आहे परंतु त्यांच्याकडे कापुस नाही अशांचे नाव रद्द करण्यात येणार असल्याची तसेच ज्या शेतकऱ्यांचे नाव टोकन यादीत समाविष्ट आहे व कापुसही आहे त्यांचा कापूस खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.परंतु ज्या शेतकऱ्यांने आपले नाव टोकन यादीत नोंदविले नाही व त्यांचेकडे कापुस आहे अशा शेतकऱ्यांचा ही कापुस खरेदी करण्यात येणार आहे.अशा प्रकारचा निर्णय झाल्यामुळे कोरपना व राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश कमी होण्यास मदत होणार हे मात्र नक्की.शेतकऱ्यांच्या शेतीचा अखेरचा बोंड खरेदी करण्याचा निर्णय सिसिआय ने घेतला आहे शेतकरी सुद्धा या निर्णयाने समाधान असून खरेदी केंद्रावर सध्या पोलिस बंदोबस्त लावण्यात आला असून येवढ्या बंदोबस्तात शेतकऱ्यांना कापुस विक्रीची पाळी येवू नये यासाठी एक चांगला निर्णय घेवुन शेतकऱ्यांना सूचना केल्या आहे आणि दोन दिवसात अहवाल आल्यानंतर सुरळीतपणे कापुस खरेदी करण्यात येईल.यावेळी सहकार क्षेत्राचे अधिकारी, पोलिस प्रशासनाचे अधिकारी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधर गोडे,सचिव कवडू देरकर व शेतकरी प्रतिनिधी उपस्थीत होते.यामुळे बोगस यादी आपोआप रद्द होणार असून सर्व शेतकऱ्यांचा कापूस सुरळीतपणे खरेदी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी व सिसिआय ने घेतल्यामुळे शेतकऱ्यांचा जो वाद व तिढा होता तो यानंतर सुटणार आहे.ज्या शेतकऱ्यांना भ्रमणध्वनी द्वारा संदेश येईल त्या शेतकऱ्यांनी आपापला माल विक्रीसाठी जिनिंगवर आणावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here