चंद्रपूर – चंद्रपुरातील दाताळा रस्त्यावर मूक प्राण्यांचे उपचार व संगोपन केंद्र प्यार फौंडेशन द्वारा चालविले जात असते. या संस्था कार्यालयाला मुकप्राणी संगोपन करण्याकरिता विकलांग सेवा संस्था चमू द्वारा सामाजिक कार्यकर्त्या राजुरा येथील सौ कृतिका सोनटक्के शिक्षिकेद्वारा 3000 ₹ रोख आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सीमा ठाकूर यांनी स्वनाप्रति बांधिलकी म्हणून डॉगी फूड संस्था पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी सौ संगीता चव्हाण,महिला विकास कल्याण समितीच्या सचिव सौ शोभा खोडके, ललिता मुफकलवार, यंग महिला ब्रिगेडच्या सौ पूजा शेरकी, प्रा प्राजक्ता वासेकर, इंजिनिअर अंजली चव्हाण इत्यादींच्या उपस्थितीत हा विधायक उपक्रम संपन्न झाला .
भूतलावरील सर्व प्राणिमात्रविषयी भूतदया व बांधिलकी राखण्याचे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर याननी केले.
सदर उपक्रम यशस्वी व्हावा करीता देवराव कोंडेकर,प्रसाद पान्हेरकर यांनी परिश्रम घेतले.