आमदार झाले दुचाकीवर स्वार, रणरणत्या उन्हात समस्या मार्गी लावण्याची धडपड

0
174
Advertisements


गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील शेतकर्‍यांच्या पांदन रस्त्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात मोटारसायकलने शेतशिवारात जाऊन पाहणी केली.पांदन रस्त्याची समस्या मार्गी लावावी यासाठी येथील शेतकऱ्यांनी निवेदन दिले होते.यावेळी चर्चे दरम्यान आमदार धोटे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत नाला खोलीकरणामुळे अडचणीत सापडलेला सदर पांदन रस्ता जाण्या येण्यासाठी मोकळा करून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.आमदार सुभाष धोटेसह प्रदीप मालेकर,कोरपना पं.स.माजी सभापती शाम रणदिवे,उत्तमराव पेचे,सुरेश मालेकर, भाऊजी पोटदूखे,मारोती लोखंडे,पुरुषोत्तम शेंडे,सूनील काळे,मोहन चौधरी,साईनाथ मोहुर्ले,मारोती मोहुर्ले,बालाजी वाडगूरे, प्रकाश मोहुर्ले,बंडु पेटकर,विठ्ठल लेनगूरे, अरुण सोनपीतरे,राहूल लोखंडे,तालुका कृषी अधिकारी डमाळे,विभागीय कृषी अधिकारी योगेश केलकर,संभा कोवे इतरांची उपस्थीती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here