लोकांच्या सुविधेसाठी पोलिस ठाण्याच्या सुसज्ज इमारतीचे लोकार्पण करा : खासदार बाळू धानोरकर

0
110
Advertisements

चंद्रपूर : पोलिस विभागाचा नागरिकांसोबत संवाद वाढविण्याच्या दृष्टीने खासदार बाळू धानोरकर हे नेहमी आग्रही राहिले आहेत. पोलिस ठाणे देखील अत्याधुनिक व सुसज राहण्यासाठी तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार बाळू धानोरकर नेहमी पाठपुरावा करीत आपली पोलिसांप्रती आपुलकी दाखवीत आले आहे. आमदार असताना त्यांनी भद्रावती व माजरी येथे अत्याधुनिक पोलिस ठाणे बनविण्यासाठी पाठपुरावा केला होता. भद्रावती पोलीस ठाणे बनून सेवेत आहे. परंतु माजरी पोलिस ठाणे अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे लोकांच्या सुविधेसाठी पोलिस ठाण्याची सुसज्ज इमारतीचे लोकार्पण करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना दिले.
सध्याची इमारती अतिशय जुनी असून नागरिकांना व पोलीस अधिकाऱ्यांना काम करण्यास अतिशय त्रासदायक होत आहे. नागरिकांच्या मागणी नुसार नवीन पोलीस ठाण्याची इमारतीचे काम सुरु आहे. ते अत्यंत संथ गतीने सुरु असून वारंवार त्याच्या पाठपुरावा करीत आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आज खासदार बाळू धानोरकर यांनी स्वतः या इमारतीची पाहणी केली. यावेळी सहाय्यक कार्यकारी अभियंता कोऱ्हे, बसंत सिंग, गोला कमरेच्या, राकेश दूतावार, शुभम रॉय यांची उपस्थिती होती. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन या पोलीस ठाण्याच्या इमारतीचे लोकार्पण करण्याचे निर्देश दिले. यावेळी कॉग्रेसचे नेते विनोद दत्तात्रय रामू तिवारी व बसंत सिंग उपस्थित होते.
आता काही दिवसातच नागरिकांच्या व पोलिसाच्या सेवेत हि सुसज्ज इमारत सेवेत राहणार आहे. असा विश्वास खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here